30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमंत्रालयमंत्रीमंडळात राष्ट्रवादीचे नऊ मंत्री; शिंदे गटात अस्वस्थता

मंत्रीमंडळात राष्ट्रवादीचे नऊ मंत्री; शिंदे गटात अस्वस्थता

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये अजित पवार यांच्यासह 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पण राष्ट्रवादी मागून आली आणि तिखट झाली. आमचा मुख्यमंत्री असताना पहिल्या टप्प्यात फक्त पाच आमदारांना मंत्री केले आणि ज्यांचे सरकार स्थापनेत काहीही योगदान नसणाऱ्या राष्ट्रवादीला पहिल्याच टप्प्यात नऊ मंत्रीपदे अशी दबक्या आवाजातील जोरदार चर्चा एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या शिवसेना आमदारांमध्ये आहे. यातील अनेक आमदार नाराज असून ज्यांनी आघाडी सरकारच्या काळात अर्थमंत्री असताना आम्हाला निधी देताना हात आखडता घेतला त्यांनाच भाजपने उपमुख्यमंत्री केले, असा सवाल हे आमदार करत आहेत.

एक वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार सोबत घेऊन शिवसेनेत बंड केले. यथावकाश ३० जून २०२२ मध्ये शिंदे – फडणवीस यांचे सरकार राज्यात सत्तेत आले. पण शिवसेना तुम्ही का सोडली/ बंड का केले असा सवाल माध्यमांनी शिंदे यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना वारंवार केला असता, अजित पवार हे आघाडीच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते, तेव्हा त्यांनी पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न केला, शिवसेना आमदारांना ते कमी निधी देत होते, असा तक्रारीचा सुर आमदार लावत होते. विधिमंडळाच्या उन्हाळी अधिवेशनात अनेक शिवसेना आमदारांनी ही बाब सभागृहातही मांडली होती. त्यामुळे अजित पवार यांना शिंदे गटाचे ४० आमदार किती भाव देतात हे पहावे लागणार आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर इतर आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा देत शरद पवारांच्या नेतृत्वाला रामराम केला आहे. अजित पवारांनी चार वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचे समोर आले आले आहे.

हे सुद्धा वाचा
राष्ट्रवादी भ्रष्ट पक्ष असेल तर त्याचे आमदार भाजपला कसे चालतात?; शरद पवार यांचा मोदी यांना सवाल

शिवसेनेनंतर एक वर्षांनी राष्ट्रवादीत भूकंप, अजित पवार उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीच्या ३० आमदारांचा सरकारला पाठिंबा

54 हजार कोटी रुपये खर्चून जनतेच्या माथी मारला मृत्युचा महामार्ग – नाना पटोले

अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रिपदाशी शपथ घेतली, त्यांना कोणती मंत्रिपदे मिळणार? याची चर्चा सुरु झाली आहे. अजित पवार यांच्याकडे उप मुख्यमंत्रिपदासह जलसंपदा हे खाते असेल, असा अंदाज वर्तवला जातोय. अजित पवार यांच्या गटातील आमदारांना मिळणाऱ्या मंत्रिपदाबाबतची माहिती समोर आली आहे. कोणत्या मंत्र्याला कोणती मंत्रिपदे मिळू शकतात ते पाहूयात..

अजित पवारांच्या गटाला मिळणारी संभाव्य मंत्रिपदे कोणती ?

अजित पवार : जलसंपदा
छगन भुजबळ : अन्न व नागरी पुरवठा
दिलीप वळसे पाटील : ऊर्जा
हसन मुश्रीफ : कौशल्य विकास
धनंजय मुंडे : गृहनिर्माण
आदिती तटकरे : महिला व बालकल्याण
संजय बनसोडे : पर्यटन
अनिल पाटील : लाभक्षेत्र विकास प्राधिकरण
धर्मरावबाबा आत्राम : आदिवासी कल्याण

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी