30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमंत्रालयधनंजय मुंडे उपचार घेऊन रूग्णालयातून बाहेर पडले, अन् कामाला लागले 

धनंजय मुंडे उपचार घेऊन रूग्णालयातून बाहेर पडले, अन् कामाला लागले 

टीम लय भारी

मुंबई : जनतेमध्ये लोकप्रिय असलेल्या राज्यातील ‘टॉप टेन’ नेत्यांमध्ये धनंजय मुंडे यांचे वरचे स्थान आहे. गेल्या आठवड्यात मुंडे रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. पण डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते पुन्हा जनतेमध्ये मिसळले आहेत ( Dhananjay Munde became active after discharge ).

पोटदुखीच्या त्रासामुळे धनंजय मुंडे 10 नोव्हेंबर रोजी लिलावती रूग्णालयात दाखल झाले होते. उपचारानंतर त्यांना 11 नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्ज देताना डॉक्टरांनी औषधे वेळेवर घेण्याबरोबरच आराम करण्याचीही सुचना केली होती. पण आराम करणे हे मुंडे यांच्या तत्वात कधीच बसत नाही ( Dhananjay Munde was admitted in Lilavati hospital ).

Dhananjay Munde discharged from hospital
धनंजय मुंडेंच्या हातावर सलाईन खुणा आहेत

रूग्णालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी तडक औरंगाबाद गाठले. औरंगाबाद विभागातून सतिश चव्हाण यांचा 12 नोव्हेंबर रजी पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्यात आला. हा अर्ज दाखल करण्यासाठी मुंडे स्वत: हजर राहिले. सलाईन लावल्यानंतरच्या ‘बँडेज’च्या खुणा मुंडे यांच्या हातावर स्पष्ट दिसत होत्या.

हे सुद्धा वाचा

धनंजय मुंडे रूग्णालयात दाखल

धनंजय मुंडेंचा मागासवर्गीयांसाठी मोठा निर्णय; भाजप सरकारने घातला होता कोलंदाडा, मुंडेंनी तो हटवला

धनंजय मुंडेंचे बंगले नाना पटोले, वर्षा गायकवाडांनी घेतले; मुंडेंची मात्र पंचाईत

औरंगाबादनंतर त्यांनी मतदारसंघ गाठला. मुंडे दरवर्षी आपली दिवाळी मतदारसंघातच साजरी करतात. जनतेसोबत आपला आनंद ते वाटून घेत असतात. त्यानुसार 13 ते 14 नोव्हेंबर रोजी त्यांनी मतदारसंघातील अनेक दुकाने, नवीन व्यवसायांची उद्घाटने केली. मतदारसंघात फिरून लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

‘साहेब, तुम्ही आजारी आहात. घरीच आराम करा’ असे सल्लेही त्यांच्या चाहत्यांनी दिले. चाहत्यांकडून मिळणाऱ्या अशा सल्ल्यांमुळे मुंडे यांना जनतेमध्ये मिसळण्यास आणखी हुरूप येतो अशी भावना सूत्रांनी व्यक्त केली.

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी