28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडेंचा मागासवर्गीयांसाठी मोठा निर्णय; भाजप सरकारने घातला होता कोलंदाडा, मुंडेंनी तो...

धनंजय मुंडेंचा मागासवर्गीयांसाठी मोठा निर्णय; भाजप सरकारने घातला होता कोलंदाडा, मुंडेंनी तो हटवला

टीम लय भारी

मुंबई : उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या अनुसूचीत जातीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जाते. पण भाजप सरकारच्या काळात एक विचित्र कोलदांडा घालून ठेवला होता. या कोलदांड्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र ठरत नव्हते ( Dhananjay Mude’s decision for SC students ).

धनंजय मुंडेंचा मागासवर्गीयांसाठी मोठा निर्णय; भाजप सरकारने घातला होता कोलंदाडा, मुंडेंनी तो हटवला

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी हा कोलदांडा हटविला आहे. शिवाय या योजनेचा लाभ जास्तीत जास्त तळागाळातील विद्यार्थ्यांना पोहोचावा यासाठी प्रक्रियेत आणखी काही बदल सुचविले आहेत ( Dhananjay Munde instructed changes in foreign scholarship ) .

हे आवर्जुन वाचा : मंत्रालय कॅन्टीनमधील जेवणात सापडले झुरळ

जुन्या नियमानुसार, राज्यातील विद्यार्थ्याने ज्या शाखेत पदवी शिक्षण घेतले आहे, त्याच शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्याला परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळाला असेल तर शिष्यवृत्ती दिली जात होती. दुसऱ्या शाखेत त्याला प्रवेश मिळाला असेल तर मात्र शिष्यवृत्ती दिली जात नव्हती.

Mahavikas Aghadi

वास्तवात, भारतात सुद्धा ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’च्या नियमानुसार अनेक अभ्यासक्रमांना आंतरशाखीय प्रवेश दिले जातात. कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांतील पदवीधारक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी दुसऱ्या शाखेत प्रवेश दिला जातो.

असे असतानाही भाजप सरकारच्या काळातील विचित्र नियमामुळे दुसऱ्या शाखेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती दिली जात नव्हती. धनंजय मुंडे यांनी आता हा नियमच हटवून टाकला आहे.

नव्या नियमानुसार, जर परदेशी विद्यापीठाने संबंधित विद्यार्थ्याला विशिष्ट शाखेत पदव्युत्तर प्रवेश दिला असेल, तर भारतात त्याने घेतलेले पदवी शिक्षण अन्य कोणत्याही शाखेचे असले तरी तो विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी गोरगरीबांच्या कल्याणासाठी घेतला निर्णय, पण त्यांचाच लोकांनी जाळला पुतळा

धनंजय मुंडे पाच तास अडकले ‘ट्राफिक’मध्ये, पावसाचा फटका

शरद पवारांचे मागासवर्गीयांच्या भल्यासाठी आणखी एक पाऊल

धनंजय मुंडेंची मोठी घोषणा, डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या महाविद्यालयासाठी 13 कोटी देणार

धनंजय मुंडेंचे बंगले नाना पटोले, वर्षा गायकवाडांनी घेतले; मुंडेंची मात्र पंचाईत

गोपीनाथ मुंडे यांचे दोन विश्वासू ‘महाविकास आघाडी’ सरकारमध्ये सर्वोच्च पदावर

ForeignScholarship : परदेशी शिष्यवृत्तीबाबत गैरसमज, धनंजय मुंडेंनी सांगितले नवे फायदे

Breaking : माजी IAS नीला सत्यनारायण यांचे ‘कोरोना’मुळे निधन

वयोमर्यादेत वाढ, अर्ज सादरीकरणासाठीही मुदतवाढ

या अभ्यासक्रमाला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याच्या वयोमर्यादेतही वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35, तर पीएचडीसाठी 40 अशी वयोमर्यादा निश्चित केली आहे.

चालू शैक्षणिक वर्षासाठी अर्ज स्विकारण्याबाबत समाजकल्याण आयुक्तालयामार्फत अधिसूचना जारी केली आहे. त्यासाठी 14 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत आहे. परंतु ही मुदत वाढविण्याची सुचनाही मुंडे यांनी समाजकल्याण आयुक्तांना केली आहे.

‘कोरोना’च्या महामारीमुळे इच्छूक उमेदवारांना अर्ज व सोबतची कागदपत्रे प्रत्यक्ष येऊन सादर करणे अशक्य आहे. त्यामुळे ई-मेल अथवा ऑनलाईन पद्धतीनेच कागदपत्रे स्विकारावीत अशी सुचनाही मुंडे यांनी केली आहे.

धनंजय मुंडे यांनी केलेल्या या सुचनांमुळे परदेशी शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, असे सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.धनंजय मुंडेंचा मागासवर्गीयांसाठी मोठा निर्णय; भाजप सरकारने घातला होता कोलंदाडा, मुंडेंनी तो हटवला

Dhananjay Munde decision
धनंजय मुंडे यांनी घेतलेले निर्णय

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी