34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमंत्रालयEknath Shinde : मुख्यमंत्र्यांची झोप ठरतेय कुतुहलाचा विषय!

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची झोप ठरतेय कुतुहलाचा विषय!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भूमिकेविषयी जनमाणसांमध्ये उलटसूलट भावना आहेत. मात्र शिंदे यांचे कष्ट, जीव ओतून काम करण्याची सवय, कामाचा त्यांनी लावलेला सपाटा या विषयी कुणीच शंका घेवू शकणार नाही. रात्री उशिरापर्यंत जागरण करून ते काम करतात.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भूमिकेविषयी जनमाणसांमध्ये उलटसूलट भावना आहेत. मात्र शिंदे यांचे कष्ट, जीव ओतून काम करण्याची सवय, कामाचा त्यांनी लावलेला सपाटा या विषयी कुणीच शंका घेवू शकणार नाही. रात्री उशिरापर्यंत जागरण करून ते काम करतात. त्यांची झोपण्याची वेळ पहाटे चार वाजताची असते. चार वाजण्याच्या अगोदर ते कधीच झोपत नाहीत. चार वाजता झोपल्यानंतर सकाळी साधारण नऊ वाजता ते पुन्हा कामाला लागलेले असतात. म्हणजे जेमतेम चार तास ते झोप घेतात. झपाटून काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या या कार्यपद्धतीमुळे सरकारी यंत्रणेने सुद्धा वेग पकडला आहे. अधिकाऱ्यांमधील मरगळ निघून गेली आहे.

हे सुद्धा वाचा…

Uday Samant : उदय सामंतांच्या ताफ्यात 19 मातब्बर अधिकारी!

Jaykumar Gore : जयकुमार गोरे होणार जलसंपदा खात्याचे मंत्री!

Moonlighting And Market: कर्मचाऱ्याने एकाच वेळी दोन संस्थांमध्ये काम करणे हे नैतिकतेला धरून नाही

‘अजितदादा पहाटे सात वाजता कामाला सुरूवात करतात. पण मी पहाटे सहा वाजेपर्यंत काम करतो’ असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्या अनुषंगाने ‘लय भारी’ने माहिती घेतली. साधारण चार वाजता एकनाथ शिंदे झोपी जातात. बऱ्याचदा सहा वाजेपर्यंत सुद्धा ते काम करीत असतात. रात्री नऊ, दहा वाजेपर्यंत बैठकाच सुरू असतात. त्यानंतर सुद्धा अनेक मान्यवर भेटण्यासाठी येत असतात. त्यामुळे वेळ पुरत नाही. अशातच नव्या सरकारकडून लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. भाजप व शिंदे गटातील आमदार, कार्यकर्ते, सामान्य लोकं अनेक कामे घेवून मुख्यमंत्र्यांकडे येत असतात.

दुसऱ्या बाजूला विविध खात्यांच्या महत्वाच्या फाईल्स सुद्धा दररोज मुख्यमंत्र्यांकडे येवून पडत असतात. या फाईल्सचा निपटारा करण्यासाठी रात्री काम करणे हाच एकमेव मार्ग असतो. त्यामुळे मुख्यमंत्री उशिरापर्यंत काम करतात, असे सूत्रांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या कामाचा झपाटा फार मोठा आहे. प्रशासनावर त्यांची वचक आहे. त्यामुळे त्यांनी प्रशासकीय यंत्रणाही चांगल्या पद्धतीने कामाला जुंपली आहे.

विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांची भेट घेणे फार अवघड होते. पण एकनाथ शिंदे यांची भेट घेणे सहजसोपे झाले आहे. उद्धव ठाकरे कुणाशीच भेटत नव्हते. एकनाथ शिंदे मात्र कुणालाही भेटतात. शिंदे यांना भेटायला येणाऱ्यांची संख्या अफाट आहे. ते बंगल्यावर असो किंवा मंत्रालयात, जिथे जातील तिथे लोकांचा गराडा असतो.
एकनाथ शिंदे ज्यावेळी मंत्रालयात असतात. तेव्हा वऱ्हांड्यात पाय ठेवायला सुद्धा जागा शिल्लक नसते इतकी गर्दी असते. बंगल्यावर भेटायला आलेल्या लोकांचीही गर्दी मोठी असते. लोकांना रांगेत उभे करतानाही सुरक्षा रक्षकांच्या नाकीनऊ येतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी