31 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रVedanta Foxconn Project : वेदांता – फॉक्सकॉनने शेपूट घातले, महाराष्ट्राला पुन्हा लाल...

Vedanta Foxconn Project : वेदांता – फॉक्सकॉनने शेपूट घातले, महाराष्ट्राला पुन्हा लाल गाजर दाखवले

महाविकास आघाडी सरकारने सातत्याने प्रयत्न करून वेदांता – फॉक्सकॉन सारखा प्रकल्प आणून त्यासाठी दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती, परंतु असे काहीच झाले नाही उलट हा महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट सरळ गुजरातला गेला हे महाराष्ट्राचे अपयश असल्याचे अनेक विरोधी पक्षांनी खंत व्यक्त केली त्यामुळे वेदांता – फॉक्सकॉनने शेपूट घालून महाराष्ट्राला केवळ पुन्हा लाल गाजर दाखवले असल्याची केविळवाणी स्थिती सध्या पाहायला मिळत आहे. 

राज्यात सध्या वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्पावरून एक वेगळाच वाद सुरू झाला आहे, त्यामुळे राज्य सरकार पुरते अडचणीत आलेले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक कंपन्यांना महाराष्ट्राचे दार गुंतवणुकीसाठी उघडे करत मोठ्या मोठ्या कंपन्यांना राज्यात आणण्याचे काम करण्यात आले जेणेकरून येथील तरुणांच्या हाताला काम मिळेल परंतु घडले भलतेच नवे सरकार आले आणि या गुंतवणुकींचा बट्ट्याबोळ झाला. कंपन्या महाराष्ट्रातून काढता पाय घेऊ लागले आहेत. याला जबाबदार कोण हा जरी वादाचा मुद्दा ठरत असला तरीही महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसणे हा नवाच उद्योग सध्या पाहायला मिळू लागला आहे. दरम्यान कळीचा मुद्दा ठरणाऱ्या वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पाने स्पष्टीकरण देत प्रकल्पाने महाराष्ट्राला पुन्हा लाल गाजर दाखवले आहे.

वेदांत रिसोर्स लिमिटेडचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत सदर वादावादीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ट्विटमध्ये अनिल अग्रवाल  म्हणतात, वेदांत-फॉक्सकॉन बहु-अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसाठी व्यावसायिकरित्या साइटचे मूल्यांकन करत आहे. ही एक वैज्ञानिक आणि आर्थिक प्रक्रिया आहे ज्याला अनेक वर्षे लागतात. आम्ही याची सुरुवात सुमारे 2 वर्षांपूर्वी केली होती. आमचा उद्देश साध्य करण्यासाठी आमच्या अंतर्गत आणि बाह्य अशा व्यावसायिक एजन्सीच्या टीम काही राज्ये जसे गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू या राज्यांत गेल्या 2 वर्षांपासून आम्ही त्या त्या सरकारशी तसेच केंद्र सरकारशी संलग्न आहोत आणि आम्हाला याबाबत उत्कृष्ट पाठिंबा मिळाला असे म्हणून अग्रवाल यांनी प्रोजेक्टच्या घडामोडींविषयी माहिती दिली.

हे सुद्धा वाचा…

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची झोप ठरतेय कुतुहलाचा विषय!

Uday Samant : उदय सामंतांच्या ताफ्यात 19 मातब्बर अधिकारी!

Jaykumar Gore : जयकुमार गोरे होणार जलसंपदा खात्याचे मंत्री!

पुढे अनिल अग्रवाल म्हणतात, यामध्ये सुद्धा गुजरातने आमच्या अपेक्षा पूर्ण केल्यामुळे आम्ही काही महिन्यांपूर्वी गुजरातला जाण्याचा निर्णय घेतला, परंतु जुलैमध्ये महाराष्ट्राच्या नेतृत्वासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी स्पर्धात्मक ऑफरसह इतर राज्यांना मागे टाकण्याचा प्रचंड प्रयत्न केला. सध्या आम्हाला एकाच ठिकाणी सुरुवात करायची आहे आणि व्यावसायिक आणि स्वतंत्र सल्ल्यानुसार आम्ही गुजरातची निवड केली असे म्हणून त्यांनी उलट सूलट होणाऱ्या चर्चांना विराम दिला आहे. ही अब्जावधी डॉलरची दीर्घकालीन गुंतवणूक भारतीय इलेक्ट्रॉनिक्सची दिशा बदलेल. आम्ही संपूर्ण भारतातील इकोसिस्टम तयार करू आणि महाराष्ट्रातही गुंतवणूक करण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध असू असे म्हणून आमच्या गुजरात JV मध्ये एकीकरण पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र आमची गुरुकिल्ली असेल असे अनिल अग्रवाल यांनी यावेळी म्हटले आहे.

दरम्यान वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्पाने गुजरातची निवड केल्याने महाराष्ट्रात मात्र राजकीय वादाला चांगलेच तोंड फुटले आहे, त्यामुळे विरोधी गटातील नेते राज्यकर्त्यांना सध्या याच मुद्यावरून धारेवर धरत आहेत. परंतु सत्ताधाऱ्यांकडून वेगळाच सूर ऐकायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, मला खेद होतो की केवळ राजकीय स्वार्थीपणासाठी अतिशय चुकीचे, नकारात्मक आणि निराधार दावे केले जात आहेत. पण असे करून ते केवळ त्यांच्या अकार्यक्षमतेचेच प्रदर्शन करीत आहेत असे म्हणून त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, वेदान्त-फॉक्सकॉन महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाण्याबाबत बोलताना मोदी यांनी त्यांची मीमांसा केली. कंपनीची मानसिकता थोडी बदलली असेल. आपल्याला महाराष्ट्रात आवश्यक तसा पाठिंबा मिळणार नाही, असे कंपनीला वाटले असेल. महाराष्ट्रात सरकार बदलेल याची कंपनीला तरी कल्पना कुठे असेल असे म्हणून या प्रकल्पाबाबत पंतप्रधान मोदींशी बोलणं झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आणि महाराष्ट्रात यापेक्षा मोठे प्रकल्प आणण्यासाठी केंद्र सरकार मदत करेल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला.

खरंतर महाविकास आघाडी सरकारने सातत्याने प्रयत्न करून वेदांता – फॉक्सकॉन सारखा प्रकल्प आणून त्यासाठी दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती, परंतु असे काहीच झाले नाही उलट हा महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट सरळ गुजरातला गेला हे महाराष्ट्राचे अपयश असल्याचे अनेक विरोधी पक्षांनी खंत व्यक्त केली त्यामुळे वेदांता – फॉक्सकॉनने शेपूट घालून महाराष्ट्राला केवळ पुन्हा लाल गाजर दाखवले असल्याची केविळवाणी स्थिती सध्या पाहायला मिळत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी