31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
Homeमंत्रालयUday Samant : उदय सामंतांच्या ताफ्यात 19 मातब्बर अधिकारी!

Uday Samant : उदय सामंतांच्या ताफ्यात 19 मातब्बर अधिकारी!

नवे अधिकारी लवकरच रूजू होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या जागेवर यापूर्वी काम करीत असलेल्या अधिकाऱ्यांची मात्र मोठी पंचाईत झाली आहे. या अधिकाऱ्यांना उदय सामंत यांनी कार्यमुक्त केले आहे. ‘महाविकास आघाडी सरकार’च्या काळात या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या होत्या. ही पदे मिळविण्यासाठी मोठी किंमतही मोजावी लागली होती.

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आपल्या खात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर आता खात्यात बारीक लक्ष घातले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा’मध्ये (MIDC) कायापालट घडवून आणण्यासाठी त्यांनी तब्बल 19 अधिकाऱ्यांची निवड केली आहे. मंत्रालयात व राज्यात अन्य ठिकाणी महत्वाच्या पदांवर काम केलेले हे अधिकारी आता लवकरच उद्योग खात्यात रूजू होणार आहेत. या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची फाईल सध्या मुख्यमंत्री कार्यालयात आहे. त्यामुळे मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होऊन येत्या दोन – चार दिवसांत या 19 अधिकाऱ्यांचे नियुक्त्यांचे आदेश जारी होतील, अशी माहिती सूत्रांनी ‘लय भारी’ला दिली.

एमआयडीसीमध्ये नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे व पदे पुढील प्रमाणे : शिवाजी पाटील (उपमुख्य कार्यकारी अधिकारी 2), वंदना सुर्यवंशी (उपमुख्य कार्यकारी अधिकारी 3), उपेंद्र तामोरे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी -4), डॉ. प्रशांत भामरे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी – पर्यावरण), प्रशांत जोशी (प्रादेशिक अधिकारी, ठाणे-1), सुनील भुताळे (प्रादेशिक अधिकारी, ठाणे 2), राजेंद्र बोरकर (प्रादेशिक अधिकारी, महापे), संतोष थिटे (प्रादेशिक अधिकारी, पनवेल), बाळासाहेब खांडेकर (प्रादेशिक अधिकारी, पुणे 1), उदय किसवे (प्रादेशिक अधिकारी, नाशिक), चेतन गिरासे (प्रादेशिक अधिकारी, औरंगाबाद), मच्छिंद्र सुकटे (प्रादेशिक अधिकारी, रत्नागिरी), तुषार मठकर (महाव्यवस्थापक, मनुष्यबळ विकास), रवींद्र पवार (महाव्यवस्थापक, भू संपादन), प्रशांत रूमाले (महाव्यवस्थापक, जनसंपर्क), हेमंत निकम (महाव्यवस्थापक, विकास), करण शिंदे (महाव्यवस्थापक, वसाहत व्यवस्थापन), बाप्पासाहेब थोरात (महाव्यवस्थापक – भूमी), संतोष भिसे (महाव्यवस्थापक – विशेष प्रकल्प).

हे सुद्धा वाचा…

Jaykumar Gore : जयकुमार गोरे होणार जलसंपदा खात्याचे मंत्री!

Moonlighting And Market: कर्मचाऱ्याने एकाच वेळी दोन संस्थांमध्ये काम करणे हे नैतिकतेला धरून नाही

Maharashtra project : महाराष्ट्राचा दुसरा प्रकल्प गुजरातने पळवला !

हे नवे अधिकारी लवकरच रूजू होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या जागेवर यापूर्वी काम करीत असलेल्या अधिकाऱ्यांची मात्र मोठी पंचाईत झाली आहे. या अधिकाऱ्यांना उदय सामंत यांनी कार्यमुक्त केले आहे. ‘महाविकास आघाडी सरकार’च्या काळात या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या होत्या. ही पदे मिळविण्यासाठी मोठी किंमतही मोजावी लागली होती. सरकार बदलल्यानंतर अचानक उचलबांगडी झाल्याने अधिकाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. साधारण 10 अधिकाऱ्यांची अशा पद्धतीने उचलबांगडी केली आहे. त्यातील काहीजणांचा तीन वर्षांचा कालावधी सुद्धा पूर्ण झालेला नाही. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांनी सामंत यांच्या या निर्णयाला मॅटमध्ये आव्हान दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी