31 C
Mumbai
Thursday, August 31, 2023
घरमंत्रालयमंत्रालयाजवळ स्फोट! काही दगड आदळले, खिडक्यांच्या काचा फुटल्या

मंत्रालयाजवळ स्फोट! काही दगड आदळले, खिडक्यांच्या काचा फुटल्या

राज्याचा कारभार ज्या मंत्रालयात चालतो त्याच्या जवळ सध्या मेट्रोची कामे सुरू आहेत. या कामामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी तर होतेच शिवाय गटरचे पाणी थेट मंत्रालयात शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. असे असतानाच,
गुरुवारी या मेट्रो कामाचा एक भाग म्हणून सुरुंग लावण्यात आला होता. खरंतर हा छोटा स्फोट होता. पण या स्फोटामुळे मंत्रालयाबाहेर असलेल्या वाहनांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय मंत्रालयाजवळ असणाऱ्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचा देखील फुटल्या आहेत. त्यामुळे हा स्फोट घडवण्याआधी सुरक्षेची योग्य काळजी घेतली गेली नव्हती का? असा प्रश्न निर्माण झालाय.

वास्तविक पाहता मंत्रालय परिसरात मेट्रो प्रकल्प उभारण्याची आवशक्य नव्हते. पण सरकारने हा प्रकल्प येथे रेटला आहे. त्यामुळे मंत्रालयासमोर  असणारी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि अन्य पक्षांची कार्यालये अन्यत्र हलवण्यात आलेली आहेत. मंत्रालय हा संवेदनशील परिसर म्हणून ओळखला जातो. मुंबईवर कसाब आणि त्याच्या साथीदाराने हल्ला केल्यावर सुदैवाने मंत्रालय बंद असल्याने जीवितहानी झाली नाही.

मंत्रालयाच्या समोर मेट्रोचं काम सुरु आहे. मेट्रोच्या कामानिमित्त छोटे-छोटे सुरुंग लावले जातात. पण त्याचाच फटका मंत्रालय परिसरात बसला आहे. मंत्रालय परिसरात असलेल्या इमारतीच्या काचा फुटल्या आहेत. स्फोट झाल्यानंतर काही दगड उडून आले. त्यामुळे इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. तसेच वाहनांचंदेखील नुकसान झालंय. या स्फोटानंतर काही दगड हे मंत्रालय परिसरातही आदळले. हे दगड कुणा नागरिकाला लागले असते तर त्यांना दुखापत झाली असती. सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही. पण गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत.
हे सुद्धा वाचा
अडाणी समूहावर नवं संकट; कंपनीच्या शेअर्समध्ये झाली एवढी मोठी घट
मंत्री, सचिवांना व्हिडीओ कॉन्फरन्सची हौस; पण अधिकाऱ्यांना डोकेदुखी
ती लाचारी महाराष्ट्राला मान्य आहे का? भाजपा नंतर शिवसेना शिंदे गटाचा ठाकरे सेनेला सवाल

मंत्रालय परिसरात मोठमोठ्या मंत्र्यांच्या गाड्या पार्किंगमध्ये उभ्या असतात. अतिशय सुरक्षेचा हा परिसर आहे. मंत्र्यांची सुरक्षा फार महत्त्वाची मानली जाते. असं असताना या अशाप्रकारच्या स्फोट घडवून आणताना सुरक्षेची काळजी घेणं जास्त अपेक्षित असतं. त्यामुळे यामध्ये दुर्लक्ष करण्यात आलंय का? याची चौकशी होणं जास्त गरजेचं असणार आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात अशाप्रकारचे सुरुंग लावले जात आहेत. मंत्रालयाच्या जुन्या इमारतीला या स्फोटाचा फटका बसला आहे. स्फोटानंतर दगड आदळल्याने इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत.

विशेष म्हणजे मंत्रालयसारख्या अतिशय महत्त्वाच्या आणि संवेदनशील परिसरात अशाप्रकारची घटना घडत असेल तर ही चिंतेची बाब आहे. वास्तविक पाहता मंत्रालय परिसरात मेट्रो प्रकल्प उभारण्याची आवशक्य नव्हते. पण सरकारने हा प्रकल्प येथे रेटला आहे. त्यामुळे मंत्रालयासमोर  असणारी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि अन्य पक्षांची कार्यालये अन्यत्र हलवण्यात आलेली आहेत. मंत्रालय हा संवेदनशील परिसर म्हणून ओळखला जातो. मुंबईवर कसाब आणि त्याच्या साथीदाराने हल्ला केल्यावर सुदैवाने मंत्रालय बंद असल्याने जीवितहानी झाली नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी