31 C
Mumbai
Thursday, August 31, 2023
घरक्राईमबायकोच्या मानलेल्या भावावर आला 'तसला' संशय; अल्पवयीन मुलाची हत्या करुन घरातच लपविला...

बायकोच्या मानलेल्या भावावर आला ‘तसला’ संशय; अल्पवयीन मुलाची हत्या करुन घरातच लपविला मृतदेह

बायकोच्या १७ वर्षांच्या मानलेल्या भावाचे तिच्यासोबत अनैतिक संबध असल्याच्या संशयातून महिलेच्या पतीने त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे पाच तुकडे करुन तो घरातच लपवून ठेवला. ही घटना मुंबईतील चेंबूरमध्ये घडली असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. महिलेच्या वडिलांमुळेच जावयाचे दृष्कृत्य उघडकीस आले आले असून मृत अल्पवयीन मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मृत अल्पवयीन मुलाचे नाव ईश्वर भगवान गायकवाड (वय 17) असे आहे. ईश्वरचे पालनपोषण आरोपीचे सासरे आणि पत्नी करत होते. मृत ईश्वर हा महिलेचा सख्खा भाऊ नव्हता. इश्वरला ती मानलेला भाऊ मानत होती. इश्वरचे महिलेच्या घरी येणे जाणे असायचे, त्याचा संशय महिलेच्या पतीला शफीक अहमद याला आला, इश्वरचे आपल्या पत्नीसोबत अश्लील संबंध असल्याचे त्याला वाटत होते. याच संशयातून शफीक याने ईश्वरची हत्या केली. त्यानंतर ईश्वरच्या मृतदेहाचे तुकडे करुन मृतदेह घरातच लपवून ठेवला.

दरम्यान महिलेच्या वडिलांना ईश्वर दोन तीन दिवस घरी न आल्यामुळे ते मुलीच्या घरी आले त्यांनी जावई शफीक याच्याकडे ईश्वरबाबत विचारपूस केली. मात्र सुरुवातील त्याने टाळाटाळ केली. त्यानंतर महिलेच्या वडिलांनी ईश्वर तुझ्याच सोबत गेला होता, असा जाब विचारला असता त्याने आपण ईश्वरची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करुन घरात लपवून ठेवल्याचे सांगितले.

हे सुद्धा वाचा 
मंत्रालयाजवळ स्फोट! काही दगड आदळले, खिडक्यांच्या काचा फुटल्या
गिरीष महाजनांचे पाऊल आदित्य ठाकरेंच्याही पुढे
वेटरने अल्पवयीन मुलीला अगोदर डोळा मारला, नंतर स्पर्श केला; मग पोलिसांनी बेड्या टोकल्या

दरम्यान याप्रकरणी पोलिसांना खबर दिल्यानंतर पोलिसांनी शफीक अहमद याला अटक केली असून त्याच्या विरोधात कलम 302, कलम 201 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ईश्वरच्या मृतदेहाचे तुकडे ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवून दिले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी