33 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमंत्रालयIAS transfer : तुकाराम मुंढे यांच्यासह 20 अधिकाऱ्यांच्या बदल्या

IAS transfer : तुकाराम मुंढे यांच्यासह 20 अधिकाऱ्यांच्या बदल्या

शिंदे-फडणवीस सरकारने आज तब्बल 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यापासून अधिकाऱ्यांच्या बदल्याचा सपाटा सरकारने सुरू ठेवला आहे. अनेक आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे गेल्या सात आठ महिन्यांपासून सत्र सुरुच आहे. आज बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये धडाकेबाज अधिकारी अशी ओळख असलेले तुकाराम मुंढे यांचा देखील समावेश आहे. महिनाभरापूर्वीच तुकाराम मुंडे यांची पशुसंवर्धन खात्याचे मुख्य सचिव म्हणून बदली झाली होती. आज पून्हा त्यांच्या बदलीचे आदेश निघाले असून मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी मुंढे यांची नियुक्ती केली आहे.

आयएसएस तुकाराम मुंढे यांची आजवरची कारकिर्द त्यांच्या कडक शिस्तीचे आणि धडाकेबाज कामगिरी करणारे अधिकारी म्हणून जशी ओळखली जाते, तशीच त्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे देखील ओळखली जाते. ज्या विभागात त्यांची बदली होते. तेथे पहिल्या दिवसापासून ते झाडाझडती घ्यायला सुरुवात करतात. बेशिस्त कर्मचाऱ्यांना वठणीवर आणतात, अशीच त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे बदल्यांचा वनवास देखील त्यांच्या नशिबी असल्याचे सर्वसामान्यांमध्ये बोलले जाते. आज सनदी अधिकाऱ्यांच्या निघालेल्या बदल्यांच्या आदेशामध्ये मुंढे यांच्यासह खालील अधिकाऱ्यांची बदली झाली आहे.

1 सुजाता सौनिक : यांची सामान्य प्रशासन विभागाचाच्या मुख्य सचिव पदावरुन गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे.

2 एस. व्ही. आर श्रीनिवास : यांची एमएमआरडीएच्या आयुक्तपदावरुन धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विशेष कर्तव्य अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

3 लोकेश चंद्र : यांची बेस्टच्या जनरल मॅनेजर पदावरुन महाडिस्कॉमच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केली आहे.

4 राधिका रस्तोगी : यांची विकास आणि नियोजन विभागात प्रधान सचिव आणि विकास आयुक्तपदी बदली केली आहे.

5 आय. ए. कुंदन : यांची  अल्पसंख्याक विकास विभागाचाच्या प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली आहे.

6 संजीव जयस्वाल : यांची म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

7 आशीष शर्मा : नगरविकास विभागात प्रधान सचिवपदी बदली केली आहे.

8 विजय सिंघल : यांची महाडिस्कॉमच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदावरुन बेस्टच्या जनरल मॅनेजरपदी बदली केली आहे.

9 अंशु सिन्हा : यांची खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावरुन ओबीसी बहुजन कल्याण विभागाच्या सचिवपदी बदली केली आहे.

10 अनुप यादव : यांची अल्पसंख्यांक विभागाच्या सचिवपदावरुन महिला आणि बालकल्याण विभागाच्या सचिवपदी बदली केली आहे.

11 तुकाराम मुंढे : यांची पशुसंवर्धन विभागाच्या मुख्य सचिवपदावरुन मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी बदली केली आहे.

12 डॉ. अमित सैनी : यांची महाराष्ट्र मेरिटाईमच्या मुख्यकार्यकारी अधिकारीपदावरुन जीवन मिशनच्या संचालकपदी बदली केली आहे.

13 चंद्रकांत पुलकुंडवार : यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरुन साखर आयुक्त (पुणे) येथे बदली केली आहे.

14 डॉ. माणिक गुरसाळ : यांची उद्योग विभागाचे अतिरिक्त विकास आयुक्तपदावरुन महाराष्ट्र मेरिटाईमच्या मुख्यकार्यकारी अधिकारीपदी बदली केली आहे.

15 प्रदिपकुमार डांगे : यांची नागपूर येथे रेशीम उद्योग विभागाच्या संचालकपदी बदली केली आहे.

16 शंतनू गोयल : यांची नागपूर मनरेगा आयुक्तपदावरुन सिडको (नवी मुंबई) च्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली केली आहे.

17 पृथ्वीराज बी.पी. : यांची लातूरच्या जिल्हाधिकारीपदावरुन मुंबईत माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सचिवपदी बदली केली आहे.

18 डॉ. हेमंत वसेकर : यांची एनआरएलएमच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावरुन पुणे येथे पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तपदी बदली केली आहे.

19 सुधाकर शिंदे : यांची मुंबई महापालितकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.

20 कादंबरी बलकवडे : यांची महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) पुणे येथे महासंचालकपदी बदली केली आहे.

हे सुद्धा वाचा

नोकरीची संधी ! IBPS अंतर्गत 8594 पदांची भरती; पदवीधर असाल तर लगेच करा अर्ज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याचे काही अविस्मरणीय क्षण !

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात दलालांचा आरटीओला विळखा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी