31 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात दलालांचा आरटीओला विळखा

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात दलालांचा आरटीओला विळखा

स्वच्छ आणि सुंदर ठाणे करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही असून त्यानुसार शहराचे रुप
पालटवण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर प्रयत्नशील आहेत. असे ठाण्याचे एक मोहक चित्र असताना दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील आरटी ओला दलालांचा विळखा पडला आहे. साधा फॉर्म भरून देण्यापासून परवाना, r.n.a. फॉर्मसाठी अवाढव्य रेट लागले आहेत. एखादा गरजू माणूस काम घेऊन आल्यावर त्याला बकरा बनवण्याचे उद्योग या कार्यालयात जोरात सुरू आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर हे कार्यालय आहे. मुख्यमंत्र्यांनी एकदा सहज या कार्यालयाला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधल्यास दलाल आणि अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडू शकते.

ठाण्यात आरटीओचे दोन कार्यालये आहेत. एक जेल जवळ तर दुसरे मुख्यमंत्री शिंदे यांच्या घराजवळ लुईस वाडीत. या दोन्ही कार्यालयात दलाल मंडळींचा सुळसुळाट आहे. सामान्य माणसाला मार्गदर्शन करणारी यंत्रणाच येथे नाही. साधा ट्रान्स्फर फॉर्म पाहिजे असल्यास 50 ते 100 रूपये दलाल मंडळीना द्यावे लागतात. नवीन परवाना काढण्यासाठी सरकार 2 ते अडीच हजार घेते. पण दलाल या कामासाठी 6 हजार रुपयांची मागणी करतात. नड असलेली माणसे ते देऊन परवाना मिळवतात. परराज्यातील गाडीचे पासिंग करण्यासाठी r.n.a. फॉर्म भरावा लागतो. हे काम किचकट असते.

हे सुध्दा वाचा :

शिवराज्याभिषेक सोहळ्यात तटकरेंना दिलेल्या वागणूकीनंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या…

चालकाची तब्बेत अचानक बिघडली अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने दाखवली जिगर

शिवराज्याभिषेक दिन 2023 : मोदी म्हणाले, शिवरायांची प्रेरणा घेऊन अमृत काळातील पुढचा 25 वर्षांचा प्रवास करणार

त्यासाठी 7 ते 8 हजार रुपयांचा दलालांचा रेट आहे. आरटीओमध्ये विविध कामांसाठी नागरिक येतात. त्यांनी कोणता फॉर्म घेतला पाहिजे आदी माहिती देणारी यंत्रणा आवश्यक आहे. पण या कार्यालयात अशी यंत्रणाच नसल्याने दलालांचे फावत असल्याची प्रतिक्रिया सोनाली अभ्यंकर यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी माहिती घेण्यासाठी ठाणे आरटीओचे मुख्य अधिकारी रवी गायकवाड यांना दोनदा मोबाईलवर संपर्क साधला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी