29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeनोकरीनोकरीची संधी ! IBPS अंतर्गत 8594 पदांची भरती; पदवीधर असाल तर लगेच...

नोकरीची संधी ! IBPS अंतर्गत 8594 पदांची भरती; पदवीधर असाल तर लगेच करा अर्ज

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने विविध बँकांमध्ये 8550 हून अधिक रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. IBPS Clerk PO परीक्षा 2023 साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया देखील IBPS च्या अधिकृत वेबसाइट, ibps.in वर सुरू झाली आहे. इच्छुक उम्मेदवार खाजगी क्षेत्रातील बँकामधील रिक्त पदांसाठी देखील अर्ज करू शकतात. 1 जून ते 21 जून या कालावधीत उम्मेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

यामध्ये ऑफिस असिस्टंट(लिपिक). ऑफिसर स्केल-I/PO (सहाय्यक व्यवस्थापक), ऑफिसर स्केल-II (व्यवस्थापक) आणि ऑफिस स्केल – III (वरिष्ठ व्यवस्थापक) यांसह विविध पदांसाठी 8594 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

भरली जाणारी एकूण पदे :

एकूण पदे : 8594
लिपिक : 5538 पदे
PO : 2485 

ऑफिसर स्केल-II जनरल बँकिंग ऑफिसर : 332 पदे
अधिकारी स्केल 2 IT : 68 पदे
ऑफिसर स्केल 2 CA : 21 पदे
अधिकारी स्केल 2 : 24 पदे
ट्रेझरी ऑफिसर स्केल 2 : 8 पदे
मार्केटिंग ऑफिसर स्केल 2 : 3 पदे
कृषी अधिकारी स्केल 2 : 60 पदे
अधिकारी स्केल 3 : 73 पदे 

IBPS RRB 2023 भरतीसाठी IBPS च्या अधिकृत वेबसाइट www.ibps.in वर जा आणि नवीन नोंदणीसाठी “click here for new ragistration” येथे क्लिक करून पोर्टलवर नोंदणी करा. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज शुल्क भरा.  

महत्वाच्या तारखा :
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जून.
प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख: 10 जुलै.

IBPS RRB लिपिक प्रिलिम्स परीक्षेची तारीख: ऑगस्ट 05, 06, 12, 13 आणि ऑगस्ट 19 (अपेक्षित)
IBPS RRB लिपिक मुख्य परीक्षेची तारीख: 16 सप्टेंबर (अपेक्षित)

IBPS RRB PO मुख्य परीक्षेची तारीख: 9 सप्टेंबर (अपेक्षित)
IBPS RRB अधिकारी II आणि III परीक्षेची तारीख: 10 सप्टेंबर (अपेक्षित)
परीक्षेचे तपशील

IBPS RRB ही राष्ट्रीय स्तरावरील बँकिंग परीक्षा आहे जी देशातील खासगी आणि ग्रामीण बँकांसाठी विविध पदांवर उमेदवारांच्या निवडीसाठी घेतली जाते.

हे सुद्धा वाचा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याचे काही अविस्मरणीय क्षण !

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात दलालांचा आरटीओला विळखा

शिवराज्याभिषेक सोहळ्यात तटकरेंना दिलेल्या वागणूकीनंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या…

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी