28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रएकनाथ शिंदे यांचे ठाण्याला मोठ गिफ्ट; 1500 हेक्टरवर साकारणार क्ल्स्टर प्रकल्प

एकनाथ शिंदे यांचे ठाण्याला मोठ गिफ्ट; 1500 हेक्टरवर साकारणार क्ल्स्टर प्रकल्प

ठाणेकरांचे क्लस्टरचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठ्या, महत्वाकांक्षी व ऐतिहासिक समुह विकास योजना (क्ल्स्टर) मूर्त रुप घेत असून असून या महत्वपूर्ण प्रकल्पाचा शुभारंभ सोहळा येत्या सोमवारी दिनांक 5 जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

ठाणे शहरात मोडकळीस आलेल्या धोकादायक अनधिकृत व अधिकृत इमारतींचा सुनियोजित व संपूर्ण नागरी पायाभूत सुविधांसह पुनर्विकास व्हावा यासाठी एकूण 45 नागरी पुनरुत्थान आराखडे तयार करण्यात आले असून त्याचे एकूण क्षेत्रफळ 1500 हेक्टर एवढे आहे. या 45 आराखड्यापैंकी अत्यंत दाटीवाटीचे क्षेत्र असलेल्या किसननगर नागरी पुर्नरुत्थान आराखडा क्र. 12 मधील नागरी पुर्नरुत्थान योजना क्र. 1 व 2 च्या कामाचा प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

अनधिकृत व अधिकृत धोकादायक इमारतीचा सामूहिक पुर्नविकास करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री शिंदे यांच्या संकल्पनेतून नियमावली तयार करण्यात आली आहे. सदर योजनेच्या कामाची सुरूवात अंतिम भूखंड क्र. 186/187 या वरील 7753 चौ.मी क्षेत्रफळावरील भूखंडावर त्याचप्रमाणे रस्ता क्रमांक 22 लगतचा भूखंड क्रमांक एफ – 3 या ठिकाणी 19275 चौ.मी. एवढया जागेवर करण्यात येणार आहे. नागरी पुनरुत्थान 1 व 2 ची अंमलबजावणी सिडको या शासनाच्या कंपनीमार्फत होणार आहे. त्याचप्रमाणे समूह विकास योजनेचे कामकाज सांभाळण्यासाठी कशिश पार्क येथे क्लस्टर पुनर्विकासचे कार्यालय निर्माण करण्यात आले आहे. या प्रशस्त कार्यालयाचे उद्घाटनही मुख्यमंत्री शिंदे हस्ते होणार आहे.

अनधिकृत इमारतीसह वसाहतीचा टाऊनशीप धर्तीवर एकत्रित पुनर्विकासाचा प्रकल्प, मोडकळीस आलेल्या घरातून थेट सुरक्षित व सुनियोजित संकुलामध्ये घर, पात्र निवासी लाभधारकास विनामूल्य 323 चौ. फूट मालकी हक्काचे घर, प्रत्येक सेक्टरमध्ये सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम सामाजिक उपक्रमांसाठी विशेष जागा, प्रत्येक सेक्टरमध्ये वाचनालय, व्यायामशाळा, आरोग्यकेंद्र आणि कम्युनिटी सेंटरची व्यवस्था, पाळणाघरासह महिला सक्षमीकरण केंद्र आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, अरुंद रस्ते आणि गजबजलेल्या गल्लीऐवजी प्रशस्त व दर्जेदार रस्ते आणि वाहतूक सुविधा, पाणीपुरवठा, मल व जलनिःस्सारण, घनकचरा व्यवस्थापनासह पायाभूत सुविधा, पुनर्विकसित टाऊनशीप आराखड्यामध्ये सुसज्ज आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजन, उद्यान पार्किंग, मंडई आदिी नागरी सुविधांचा समावेश या योजनेत आहे. प्रख्यात वास्तुविशारद हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्या डिझाईननुसार टाऊनशीपची उभारणी केली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

IAS transfer : तुकाराम मुंढे यांच्यासह 20 अधिकाऱ्यांच्या बदल्या

नोकरीची संधी ! IBPS अंतर्गत 8594 पदांची भरती; पदवीधर असाल तर लगेच करा अर्ज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याचे काही अविस्मरणीय क्षण !

या प्रकल्पाच्या निमित्ताने आशियातील सर्वात मोठ्या असणाऱ्या योजनेचा शुभारंभ होत आहे. अनेक वर्षे नागरिक प्रतीक्षा करीत असलेल्या क्लस्टर योजनेचा प्रत्यक्ष शुभारंभ होत असल्याने व त्याची अंमलबजावणी कालबदध पध्दतीने पूर्ण होणार असल्याने अधिकृत व मालकी हक्काच्या घरात राहण्याचे नागरिकांचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी