29 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरमंत्रालयमंत्रालयात शुकशुकाट, कर्मचाऱ्यांची मज्जाच मजा

मंत्रालयात शुकशुकाट, कर्मचाऱ्यांची मज्जाच मजा

राज्याचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयात सध्या गणपती उत्सवाचा माहौल असल्याने शुक्रवारी मंत्रालयात शुकशुकाट पहायला मिळत होता. शनिवार आणि रविवारी सरकारी सुट्टी असल्याने अनेकजण आपली  कामे घेऊन शुक्रवारी मंत्रालयात येत असतात. पण  गेल्या  चार  दिवसापासून सर्वत्र गणेशोत्सवाचे वातावरण असताना मंत्रालयात मंत्री, सचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकारी यांची वर्दळ कमी असल्याचे पहायला मिळत आहे.

राज्याचे प्रमुख प्रशासकीय केंद्र म्हणजे मंत्रालय. मुख्यमंत्र्यासह अख्खे मंत्रिमंडळ, विविध खात्यांचे सचिव मंत्रालयात बसत असतात. त्यामुळेच की काय तालुका, जिल्हा स्तरावर कामे झाली नाही तर अडलेली नडलेली माणसे मंत्रालयाची फेऱ्या मारतात. अनेकदा त्या त्या खात्यांचा मंत्री भेटत नाही, सचिव गैरहजर असतो, त्यामुळे अनेकांची कामे काही होत नाही. मंत्रालयात नागरिकांसह विविध कामे घेऊन येणारे  विविध पक्षांचे कार्यकर्ते, दलालांचाही वावर असतो.

मंत्रालयात दररोज पाच हजारच्या आसपास नागरिक भेटी देत असतात. त्यांना पासेस देऊन मंत्रालयात सोडण्यात येते. पण गेल्या चार दिवसापासून मंत्रालयातही गणेशोत्सवाचे वातावरण आहे. मंत्री आणि अधिकारी या सणासाठी आपापल्या गावी वा घरी राहत असल्याने त्यांच्या कार्यालयात शुकशुकाट पहायला मिळत आहे. मंत्री आणि अधिकारीच नसल्याने एरव्ही कायम गजबजले मंत्रालय नागरिक येत नसल्याने सुने सुने वाटत आहे.

हे सुद्धा वाचा
शरद पवार, वामन मेश्राम, प्रवीण गायकवाड एकाच स्टेजवर येणार
मोदींनी ओबीसींसाठी काय केले?: राहुल गांधी
‘मी नथुराम गोडसे बोलयतोय’… शरद पोंक्षे यांच्या नाटकाचे राज्यात प्रयोग

सचिवालयाचे झाले मंत्रालय 

राज्याचे एक प्रशासकीय भवन असावे यासाठी १९५५ मध्ये मंत्रालय वास्तूची निर्मिती करण्यात आली. मंत्रालयाला पूर्वी सचिवालय म्हटले जायचे. (सचिव मंडळींचे आलय अर्थात सचिवांचे सदन, ज्याला सचिवालय म्हणायचे ) पण शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी ‘सचिवाल’यचे नामकरण ‘मंत्रालय’ असे केले. तेव्हापासून सचिवालयाला मंत्रालय असे म्हणतात.

भारतातील अनेक राज्य सरकारच्या मुख्यालयांना  सचिवालय असे म्हणतात. पण महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे मंत्री, सचिव बसतात त्या जागेला मंत्रालय म्हणतात. मंत्रालयात एकूण सात मजले आहेत. सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बसतात. शिवाय याच मजल्यावर मुख्य सचिवांचे कार्यालय आहे. मंत्रालयात विविध विभागाचा कार्यभार पाहता मुख्य इमारत कमी पडत असल्याने मागच्या बाजूला याच इमारतीचा विस्तार केला. त्याला ‘अॅनेक्स’ इमारत म्हणतात. शिवाय अन्य सरकारी कार्यालयांचे समायोजन करणारी १९ मजली उभारण्यात आली.

२१ जून २०१२ मध्ये मंत्रालय च्या जुन्या इमारतीला आग लागली होती. प्राथमिक अहवालानुसार ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचे बोलले जायचे. या आगीच्या दुर्घटनेत पाच जणांचा मरण पावले. २० जण होरपळले होते. शेकडो फाइल आगीच्या भक्षस्थानी आल्या होत्या.

मंत्रालयाच्या इमारतीवरुन धरणग्रस्तांच्या उड्या, आत्महत्येचा प्रयत्न

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी