33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवार, वामन मेश्राम, प्रवीण गायकवाड एकाच स्टेजवर येणार

शरद पवार, वामन मेश्राम, प्रवीण गायकवाड एकाच स्टेजवर येणार

महात्मा फुले यांनी सामाजिक, धार्मिक सुधारणा करत समतामुलक समाजाच्या उन्नतीसाठी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. या चळवळीला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. महात्मा फुले यांच्या या कार्याचा वारसा जपण्यासाठी पुण्यात सत्यशोधक संमेलनाचे आयोजन केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

पुण्यात रविवारी (दि.24) रोजी सत्यशोधक संमेलन पार पडत आहे. हे संमेलन ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या मैदानात होणार आहे. या संमेलनासाठी संभाजी ब्रिगेड, भारत मुक्तीमोर्चाने पुढाकार घेतला असून थेरगाव येथे नियोजनासाठी संभाजी ब्रिगेडची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी प्रवीण गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या संमेलनात सहभागी होऊन चळवळीचे साक्षिदार होण्याचे आवाहन संभांजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केले.

सध्या देशात असत्याचा मार्ग अवलंबून राजकीय, सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न वारंवार केले जात आहेत. सत्य मांडणाऱ्या लोकांवर सूडबुद्धीने कारवाया केल्या जात आहेत. फॅसिस्ट शक्तींना रोखण्यासाठी सत्यशोधक आंदोलनाची प्रासंगिकता राष्ट्रीय पातळीवर आहे. या पार्श्वभूमीवर सत्यशोधक समाज स्थापनेला 150 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सत्यशोधक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा 
मोदींनी ओबीसींसाठी काय केले? : राहुल गांधी
‘मी नथुराम गोडसे बोलयतोय’… शरद पोंक्षे यांच्या नाटकाचे राज्यात प्रयोग
लालबागच्या राजाच्या चरणी आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ कोटींचे दान! वाचा..

या संमेलनासाठी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम, प्रख्यात इतिहास संशोधक प्राध्यापक मा. म. देशमुख, हमाल पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच आमदार रोहित पवार, बामसेफचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व्ही. व्ही. जाधव, आयपीएल राज्य पदाधिकारी ऍड. वासंती नलावडे, बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक विठ्ठल सातव, प्राध्यापक डॉक्टर जे. के. पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, मौर्य क्रांती संघ, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, लहुजी क्रांती मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चा आदी संघटना या संमेलनामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी दिली. या संमेलनामध्ये सत्यशोधक समाज स्थापनेमागील उद्देश, विचारधारा व आजची प्रासंगिकता तसेच सत्यशोधक समाजाचे पुनर्जीवन करणे हीच व्यवस्था परिवर्तनाची पुर्वशर्त होय अशा दोन विषयांवर चर्चासत्र होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी