34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमंत्रालयराष्ट्रवादीच्या मंत्र्याला नवसाने मिळाले दालन, पण अधिकाऱ्यांची अवस्था लिपीकासारखी

राष्ट्रवादीच्या मंत्र्याला नवसाने मिळाले दालन, पण अधिकाऱ्यांची अवस्था लिपीकासारखी

टीम लय भारी

मुंबई : मंत्री म्हटले की, त्यांच्यासाठी गाडी, नोकर चाकर, बंगला व दालन अशा सोईसुविधा असतात. सामान्य लोकांची ही समजूत. पण काही मंत्र्यांना मात्र या सुविधा मिळविताना फारच त्रास सहन करावा लागतो (Ministers, however, have to suffer a lot while getting these facilities).

राज्यमंत्री संजय बनसोडे यांची अशीच अवस्था झाली आहे. ‘महाविकास आघाडी’ सरकार सत्तेवर येऊन दीड वर्ष उलटले. पण या दीड वर्षात बनसोडे यांचे दालन तीन वेळा बदलण्यात आले आहे.

सहाव्या मजल्यावर विस्तारीत इमारतीमध्ये त्यांना दालन देण्यात आले आहे. विस्तारीत व मुख्य इमारतीला जोडणाऱ्या व्हराड्यांत बनसोडे यांना दालन दिले आहे. पण त्यांच्याकडे कार्यरत असलेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची (ओएसडी) दयणीय स्थिती आहे. साधारण ४ ओएसडी बनसोडे यांच्याकडे कार्यरत आहेत. पण या ओएसडींना बसण्यासाठी जागाच नाही (But these OSDs have no place to sit).

एकाच दालनात दोन मंत्र्यांचा कारभार

तुला आमदार मंत्री व्हायचं असेल तर बायकोवर लिंबू ओवाळून टाक

मंत्र्यांच्या बैठक खोलीतच सगळे ओएसडी एकत्रितपणे बसतात. लिपीकापेक्षा वाईट अवस्था या ओएसडींची झाली आहे. केविलवाण्या अवस्थेत या ओएसडींना पाहताना कोणालाही दया येईल.

स्वतंत्र दालन किंवा क्यूबिक नसल्यामुळे या ओएसडींनी प्रशासकीय काम तरी कसे करायचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मुळात संजय बनसोडे यांचे नशिबच फुटके. राज्यमंत्री झाल्यापासून त्यांना दालन मिळवताना बरेच पापड बेलावे लागले.

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना विधानभवनात दालन मिळाले होते. पण बनसोडे यांना मंत्रालयातच दालन हवे होते.

भारताच्या कवियत्री सुभद्रा चौहान यांना गुगलने डूडल बनवत दिली श्रद्धांजली

Maharashtra lockdown news: CM Uddhav Thackeray makes BIG statement amid threat of third wave

बनसोडे यांनी अजितदादा पवारांच्या मागे तगादा लावला. अजितदादांच्या दालनालगतच मुख्य इमारतीत दीड वर्षांपूर्वी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर बनसोडे यांना कसेबसे दालन मिळाले. पण तिथे धनंजय मुंडे यांची तात्पुरती व्यवस्था केलेली होती. बनसोडे यांनी धनंजय मुंडे यांच्या दालनातच आपले बस्तान मांडले. त्यामुळे एकाच दालनावर धनंजय मुंडे व संजय बनसोडे अशा दोन्ही मंत्र्यांचे फलक दिसत होते (The plaques of both Dhananjay Munde and Sanjay Bansode were seen on the same hall).

नंतर धनंजय मुंडे यांना पहिल्या मजल्यावर पूर्णवेळ दालन मिळाले. मुंडे यांचा कारभार पहिल्या मजल्यावर स्थलांतरीत झाला. बनसोडे यांनीही सुटकेचा निश्वास टाकला. सहाव्या मजल्यावर त्यांच्यासाठी दालन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यांनी या दालनात कारभारही सुरू केला. पण पुन्हा माशी शिंकली.

‘कोरोना’चे आगमन झाले. ‘कोरोना’च्या नियंत्रण कक्षासाठी बनसोडे यांचे दालन घेण्यात आले. राज्यमंत्री बनसोडे पुन्हा रस्त्यावर आले.

Ministers have to suffer while getting facilities
मंत्रालय

‘कोरोना’ची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर हे दालन परत मिळेल असे बनसोडे यांना वाटले होते. पण झाले भलतेच. तत्कालिन मुख्य सचिव अजोय मेहता यांचा कार्यकाळ संपला होता. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून मेहता यांची नियुक्ती करण्यात आली. ‘कोरोना’चा नियंत्रण कक्ष मेहता यांना दालन म्हणून देण्यात आला. त्यामुळे हे दालन बनसोडे यांच्या नशिबातून कायमचेच सुटले.

सरतेशेवटी सहाव्या मजल्यावरच विस्तारीत इमारतीमध्ये बनसोडे यांना दालन देण्यात आले. पण या आखूड दालनामुळे अधिकाऱ्यांची परवड सुरू आहे.

बाहेरून पाहिले तर हे दालन आकर्षक दिसते. पण आत गेल्यानंतर अधिकाऱ्यांचे चेहरे पाहवत नाहीत. अधिकारी, पीए. लिपीक, टाईपरायटर आणि शिपाई सगळेजण एकाच ठिकाणी बसतात. गोपनीय चर्चा करायची झाली तरी अधिकाऱ्यांना शक्य होत नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी