32 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeटॉप न्यूजभारताच्या कवयित्री सुभद्रा चौहान यांना गुगलने डूडल बनवत दिली श्रद्धांजली

भारताच्या कवयित्री सुभद्रा चौहान यांना गुगलने डूडल बनवत दिली श्रद्धांजली

टीम लय भारी

मुंबई : भारताच्या पहिल्या महिला सत्याग्रही व लेखिका सुभद्रा कुमारी चौहान यांना गुगलने त्यांच्या 117 व्या जयंती निमित्त श्रद्धांजली वाहिली आहे. गुगलने सोमवारी (16 ऑगस्ट) खास सुभद्रा यांच्यासाठी डूडल बनवत श्रद्धांजली वाहिली आहे (Google has created a doodle for Subhadra Kumari Chauhan).

या डूडलमध्ये सुभद्रा कुमारी यांनी सफेद रंगाची साडी परिधान केली असून त्यांच्या हातात कलम आणि समोर कागद दिसत आहे. या डूडलची निर्मिती न्यूझीलंडच्या गेस्ट कलाकार प्रभा माल्या यांनी केले आहे.

बदलीसाठी प्रांताधिकाऱ्याने महिला तलाठ्याकडे केली शरीरसुखाची मागणी

‘डिजिटल मीडिया’वर सक्ती नको, उच्च न्यायालयाचा आदेश

Google has created a doodle for Subhadra Kumari Chauhan
गुगलने वाहिली सुभद्रा कुमारी चौहान यांना श्रद्धांजली

सुभद्रा यांनी देशभक्ती वर अनेक कविता रचल्या आहेत. त्यांनी झांसीची राणी लक्ष्मीबाई वर लिहीलेली ‘ खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी ‘ ही कविता खूप प्रसिद्ध आहे.

सुभद्रा चौहान यांचा जन्म सन 1904 साली उत्तर प्रदेशच्या निहालपुर गावी झाला.त्यांना लहापणापासूनच कविता लिहिण्याची आवड होती. वयाच्या ९ व्या वर्षी त्यांची पहिली कविता प्रकाशित झाली होती. त्यांनी आपल्या कवितांमधून स्वातंत्र्य लढ्यासाठी लोकांना प्रेरित केले होते. चौहान यांच्या 88 कविता आणि 46 लघु कथा प्रकाशित झाल्या होत्या.

बाळासाहेब थोरात यांच्या हातून माता भगिनींना मदतीचा हात

Google Doodle celebrates India’s first woman Satyagrahi Subhadra Kumari Chauhan’s birth anniversary

महात्मा गांधींच्या असहयोग आंदोलनात भाग घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. त्यांचा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग होता. सुभद्रा यांनी त्यांच्या कवितांमधून स्वातंत्र्यासाठी  लढणाऱ्या तरुणांना नेहमीच प्रेरित केले होते. चौहान यांचे निधन 15 फेब्रुवारी 1948 साली वयाच्या 44 व्या वर्षी झाले. त्यांच्या कविता आजही सगळ्यांच्या स्मरणात आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी