31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमंत्रालयPolitics : आणि आदित्य ठाकरेंवर अबू आझमी भडकले

Politics : आणि आदित्य ठाकरेंवर अबू आझमी भडकले

टीम लय भारी

मुंबई : ठाकरे सरकारला आम्ही पाठिंबा देऊनही (politics) आदित्य ठाकरे साधा फोनही उचलत नसल्याने संतापलेले सपाचे आमदार अबू आझमी यांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर राज्याचे पर्यावरणमंत्री व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (Abu Azmi lashed out on Aditya Thackeray)

राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या समाजवादी पक्षाला आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली. मानखुर्द येथील एस. एम. एस कंपनी बंद करावी या मागणीसाठी त्यांनी बुधवारी हे आंदोलन केले.

यावेळी अबू आझमी म्हणाले की, ठाकरे सरकारला आम्ही पाठिंबा देऊनही ते आमचे काम ऐकत नाहीत, साधा फोनही उचलत नाही. आदित्य ठाकरेंना वारंवार फोन केला मात्र ते फोनही घेत नाही. त्यामुळे नाराज होऊन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. आदित्य ठाकरेंना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याचेही आझमी यांनी सांगितले.

‘आदित्य ठाकरे होश मे आवो, एसएमएस कंपनी बंद करो’, आदी घोषणा मंत्रालयात देण्यात आल्या. महाविकास आघाडीतील एक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाकडून सरकारच्या एका मंत्र्याविरोधातच घोषणाबाजी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मानखुर्द येथील एस.एम.एस कंपनी बंद करावी या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केले. यावेळी अबू आझमी म्हणाले की, ठाकरे सरकारला आम्ही पाठिंबा देऊनही ते आमचं काम ऐकत नाहीत, साधा फोनही उचलत नाही.

मानखुर्द, गोवंडी, शिवाजीनगर, देवनार परिसरात असलेल्या क्षेपणभूमीतील (डम्पिंग ग्राउंड) प्रदूषणाचा फैलाव करत असलेल्या एसएमएस कंपनीला तत्काळ बंद करावे, अन्यथा या विरोधात जोरदार आंदोलन करणार, असा इशारा आमदार आझमी यांनी यावेळी दिला.

आझमी म्हणाले, मानखुर्द, गोवंडी, शिवाजीनगर परिसरात प्रदूषणामुळे लाखो लोकांचे आरोग्य संकटात आले आहे. याबद्दल मागील दहा वर्षांपासून मी सरकारकडे पाठपुरावा करत आहे. पण, माझे कोणी ऐकत नाही. आज येथील लोकांचे जीवनमान हे केवळ पन्नास वर्षांच्या आत आले असून अनेकांना क्षयरोग व विविध आजारांनी ग्रासले आहेत. त्यामुळे सरकारने आता याविषयी आमचे ऐकले नाही तर, यापुढे सरकार विरोधातच माझे आंदोलन जोरात असेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

देवनार येथे असलेल्या डम्पिंग ग्राउंडवर एसएमएस नावाची कंपनी असून या कंपनीच्या माध्यमातून आसपासच्या परिसरात अत्यंत घातक वायू सोडले जातात. यामुळे येथील लोकांचे जीवन धोक्यात सापडले असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

देशाच्या लोकशाहीसाठी आजचा काळा दिवस

 

देशाच्या लोकशाहीसाठी आजचा काळा दिवस आहे, १९९२ बाबरी मस्जिद जबरदस्तीने पाडण्यात आली, संपूर्ण जगाने ते पाहिले. हा खटला अनेक वर्षापासून सुरु आहे. आमचा कायद्यावर विश्वास आहे, पण जेव्हा पासून दिल्लीत मोदी सरकार आले आहे. तेव्हापासून सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स, पोलीस यांना मोदी आणि अमित शहांनी बाहुले बनवले आहे,

बाबरीचा निकाल आला तेव्हा न्यायाधीशांनी सांगितले बाबरी मस्जिद पडली ते चुकीचे झाले, पण इतकी मोठी मस्जिद पाडली त्यात पुरावे मिळाले नाहीत. आता या देशात हेच होणार आहे, असा आरोप आमदार अबू आझमींनी केला. त्याचसोबत बॉम्बब्लास्टमधील साध्वीला सोडण्यात आले, कर्नल पुरोहित यांना सोडले, हेमंत करकरे यांनी मेहनतीने पुरावे गोळा केले. उद्या हेमंत करकरे अप्रामाणिक होते त्यांनी चुकीचे केले असे बोलले जाईल, जोपर्यंत हे सरकार आहे, तोवर या देशात न्याय मिळण्याची अपेक्षा नाही, सीबीआय मोदी सरकारचे बाहुले आहे हे मी उघडपणे बोलतो, या देशात कायद्याचे राज्य आणायचे असेल तर भाजपासारखा पक्ष सत्तेतून बाहेर काढला पाहिजे. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला धक्का पोहचवत आहेत त्यांना सत्तेतून बाहेर काढलेच पाहिजे. बाबरी ज्यांनी तोडली त्यांच्याविरोधात पुरावे मिळाले नाहीत, हे दुर्दैवी आहे, असे अबू आझमींनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी