33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमंत्रालयBreaking : रेल्वे व बस सेवा सुरूच राहणार; पण मुंबई, पुणे, नागपूर...

Breaking : रेल्वे व बस सेवा सुरूच राहणार; पण मुंबई, पुणे, नागपूर बंद : उद्धव ठाकरे यांची घोषणा

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी – चिंचवड व नागपूरमधील सगळे व्यवहार ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आले आहेत. रेल्वे, बस व जिवनावश्यक वस्तुंची दुकाने एवढ्याच सेवा चालू राहतील. सरकारी कार्यालयातील उपस्थितीचे प्रमाणही २५ टक्के कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ही घोषणा केली. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे व मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते.

ज्या कारणांमुळे बस व रेल्वेची गर्दी वाढत आहे, ते सगळे व्यवहार बंद करीत आहोत असे उद्धव ठाकरे म्हणाले. दोन दिवसांपासून रेल्वे व बसमधील गर्दीत लक्षणीय फरक पडला आहे. पण तरीही पूर्ण गर्दी कमी झालेली नाही. त्यामुळे अत्यंत नाईलाजाने काही गोष्टी आम्ही करीत आहोत. जिवनावश्यक वस्तू वगळून सगळी दुकाने व कार्यालये बंद करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मुंबई महानगर क्षेत्र (एमएमआर), नागपूर व पुणे या तीन शहारांसाठी हा निर्णय लागू केला आहे.

रेल्वे व बसेस या मुंबईच्या रक्तवाहिन्या आहेत. ते बंद करणे सोपे आहे. पण रूग्णालयात येणारे कर्मचारी, डॉक्टर, सिस्टर्स, एम्ब्युलन्सचे चालक यांची ने – आण कशी होणार. त्यामुळे तूर्त तरी आम्ही रेल्वे व बस सेवा सुरू ठेवीत आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्यात ‘कोरोना’चे ५२ रुग्ण आढळे आहेत. पण त्यापैकी ५ रुग्ण पुर्णपणे ‘कोरोना’मुक्त झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना आणखी काही दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. पण रूग्ण बरे होत असल्याचे ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले

ते पुढे म्हणाले की, ‘कोरोना’चा संसर्ग हा जागतिक युद्ध बनले आहे. या परिस्थितीमध्ये लोक मदत करायला पुढे येत आहेत. अनेक दिग्गज नैतिकतेचे भान ठेवून पुढे आले आहेत. उद्योजक काम थांबवायला पुढे आले आहेत. मला रोहित शेट्टी मला भेटले. त्यांनी एक फिल्म दिली. ती आम्ही रिलीज केली आहे. अमिताभ बच्चन, सचिन तेंडूलकर, विराट कोहली, अनिल कपूर, अक्षयकुमार, रणवीर सिंग, वरूण धवन, शिल्पा शेट्टी, आलिया भट असे चित्रपट क्षेत्रातील मान्यवर सुद्धा जनजागृतीसाठी आवाहन करत आहेत. या परिस्थितीत लोकांनाही गर्दी टाळण्यासाठी सहकार्य करायला हवे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘कोरोना’च्या आपत्कालिन कक्षात मंत्र्यांनी थाटले अनधिकृत कार्यालय

राज्यातील सर्व शिक्षकांना आळीपाळीने सुटी, आदेश जारी

अजितदादांचा निर्णय : ‘करोना’साठी होऊ दे खर्च !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी