35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजजनतेच्या कामांसाठी उपाशीपोटी मंत्रालयात धावपळ करणाऱ्या आमदारांची आरोग्य मंत्र्यांच्या दालनाच तब्येत बिघडली

जनतेच्या कामांसाठी उपाशीपोटी मंत्रालयात धावपळ करणाऱ्या आमदारांची आरोग्य मंत्र्यांच्या दालनाच तब्येत बिघडली

टीम लय भारी

मुंबई : निवडून आल्यानंतर जनतेची कामे करण्यासाठी बरेच आमदार आकाश पाताळ एक करीत असतात. विविध सरकारी योजना आपल्या मतदारसंघात खेचून नेण्यासाठी हे आमदार सतत धडपड करतात. आपल्या मतदारसंघातील कामांच्या अनुषंगाने उस्मानाबादचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील काल (सोमवारी) मंत्रालयात आले होते. एका मागोमाग एक अशा विविध मंत्री व अधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये ते उपाशी पोटानेच पाठपुरावा करीत होते. पण अतोनात धावपळ केल्याने त्यांची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या दालनातच तब्येत बिघडली.

पाटील यांना अत्यवस्थ वाटू लागले. ते पुरते घामाघूम झाले. रक्तदाब, हृदयविकार की नुसताच थकवा आहे याबद्दल तिथे उलटसुलट चर्चा सुरू झाली. त्यामुळे टोपे यांच्या दालनातील अधिकाऱ्यांची सुद्धा भंबेरी उडाली. सुदैवाने आरोग्य मंत्र्यांच्याच कार्यालयात हा प्रकार घडला होता. त्यामुळे तेथील अधिकाऱ्यांनी तात्काळ आमदार पाटील यांना कार्यालयातील मिटिंग रूममध्ये नेले. काही महत्वाच्या सुचना केल्या. मंत्रालयातील सरकारी दवाखान्यातून दुसऱ्या एका डॉक्टरांना पाचारण केले. या डॉक्टरांनी आमदार पाटील यांच्यावर प्रथमोपचार केले. उपाशीपोटी धावपळ केल्याने थकवा आला आणि आमदार पाटील यांची तब्येत बिघडली होती. तरीही सावधगिरी म्हणून डॉक्टरांनी आमदार पाटील यांना सेंट जॉर्जेस रूग्णालयात ईसीजी काढण्याची शिफारस केली.

आमदार पाटील हे उस्मानाबाद – कळंब मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांचे वय अवघे ३८ वर्षे आहे. तरूण असल्यामुळे दांडग्या उत्साहाने ते लोकांची कामे करतात. विविध मंत्र्यांना भेटून आपल्या मतदारसंघातील विविध विकासकामे पूर्ण करण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. मात्र त्यासाठी त्यांनी काल उपाशीपोटी केलेली धावपळ त्यांच्या चांगलीच अंगलट आली. त्यांना कोणताही गंभीर आजार नाही. प्रकृती एकदम ठणठणीत आहे. तरीही नको तेवढे शारीरिक व मानसिक कष्ट घेतल्याने त्यांची तब्येत बिघडली. सायंकाळी मात्र ते पूर्ण ठणठणीत झाले होते.

हे सुद्धा वाचा

एकाच दालनात दोन मंत्र्यांचा कारभार

बाळासाहेब थोरातांनी टाकलेला शब्द अजितदादांनी तात्काळ केला पूर्ण

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी