32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeसिनेमातब्बल 15 वर्षांनंतर अंकुश चौधरी पुन्हा एकदा छोट्या परद्यावर झळकणार

तब्बल 15 वर्षांनंतर अंकुश चौधरी पुन्हा एकदा छोट्या परद्यावर झळकणार

टीम लय भारी

मुंबई :- ‘मी होणार सुपरस्टार’ या डान्स रिॲलिटी शोमध्ये अभिनेता अंकुश चौधरी सुपर परिक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील डान्सचे टॅलेंट या मंचावर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. तब्बल 15 वर्षानंतर अंकुश छोट्या पडद्यावर पुन्हा पदार्पण करणार आहे (Ankush Chaudhary will once again shine on the small screen). 

‘मी होणार सुपरस्टार’ हा कार्यक्रम 21 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाह या वाहिनीवर त्याचे प्रक्षेपण होणार आहे. या कार्यक्रमात नृत्याचे वेगवेगळे प्रकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर सुपरस्टार निवडण्याची जबाबदारी ही अंकुश चौधरीवर असणार आहे.

बेल बॉटोम चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अक्षय कुमारने दिली माहिती

…त्या बातम्या मानहानीकारक कशा असू शकतात; मुंबई उच्च न्यायालयाचा शिल्पा शेट्टीला उलट प्रश्न

‘मी होणार सुपरस्टार’ या कार्यक्रमाबद्दल अंकुश म्हणतो, तब्बल 15 वर्षानंतर मला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर वळताना खूप आनंद होतो. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहशी मी पहिल्यांदाच जोडला जात आहे. तसेच मी पहिल्यांदाच परिक्षकाची भूमिका करतोय. या शोमध्ये मी जरी परीक्षकांच्या भूमिकेत असलो तरी मी प्रेक्षकांचा प्रतिनिधी म्हणून काम करणार आहे. हे सर्व करताना फरक एवढाच असणार आहे की, प्रेक्षक या कार्यक्रमाचा आनंद घरबसल्या घेतील तर मी प्रत्यक्ष तो अनुभव घेणार आहे (If the audience enjoys the show at home, I will actually experience it).

Ankush Chaudhary will once again shine on the small screen
अंकुश चौधरी

राणेंवर या नेत्यांचा पलटवार; दौऱ्या दरम्यानच्या कृतीवर सुनावले खडेबोल

Ankush Chaudhari to make his TV comeback with ‘Me Honaar Superstar – Jallosh Dance Cha’; details inside

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

स्टार प्रवाह वर 21 ऑगस्टपासून दर शनिवारी आणि रविवारी रात्री ९ वाजता हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी