31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयसंजय राऊतांचा विरोधी पक्षावर हल्लाबोल; विरोधी पक्ष मोकळा असतो, डोके रिकामे असते,...

संजय राऊतांचा विरोधी पक्षावर हल्लाबोल; विरोधी पक्ष मोकळा असतो, डोके रिकामे असते, म्हणून…

टीम लय भारी

मुंबई:- भाजप पक्ष सातत्याने राज्यसरकारने पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करत आहे. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्ष मोकळा आहे. डोके रिकामे असते. आरोप करतच असतात, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी विरोधी पक्षावर केला आहे (Sanjay Raut attack on the Opposition party)

संजय राऊत यांनी नगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर हल्ला चढवला. राज्याने पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्याबाबत राऊत यांना छेडण्यात आले. त्यावर राऊत यांनी हा हल्लाबोल केला. विरोधी पक्ष मोकळे आहेत. मोकळा माणूस असतो. डोके रिकामे असते. असे आरोप करत असतात. त्यांनाही माहीत आहे. त्यांनीही सरकार चालवले आहे, त्यांनीही शासन चालवले आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

राणेंवर या नेत्यांचा पलटवार; दौऱ्या दरम्यानच्या कृतीवर सुनावले खडेबोल

संजय राऊतांचा नारायण राणेंवर हल्लाबोल; तुम्ही कुठेही जा, तुमची ओळख शिवसैनिक म्हणूनच…

गुजरातला दिले तसे हजार कोटी द्यावेत 

पंतप्रधानांनी महाराष्ट्रात यावे. हेलिकॉप्टरवरून घिरटी मारावी आणि गुजरातला दिले तसे हजार कोटी द्यावेत आणि ताबडतोब द्यावेत, असा टोला लगावतानाच मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांसाठी काही निर्णय घेतले आहेत. आता तर प्रत्येकाच्या खात्यावर दहा हजार जमा होत आहेत.

Sanjay Raut attack on the Opposition party
संजय राऊत

लांडगा आला रे आला म्हणतात, लांडगा आलाच नाही

झारखंडमध्ये सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला. तसाच प्रयत्न महाराष्ट्रात होत आहे का? या प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिले. हा महाराष्ट्र आहे. एवढेच सांगू शकतो. विरोधक सरकार पाडण्याचा प्रयत्न करून थकलेले आहेत. भिंतीवर डोके अपटून झाले आहे. डोक फुटले, भिंत तशीच आहे. लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला, असे ते म्हणत असतात. पण लांडगा वगैरे काही येत नाही. बोलू द्या. त्यांचा वेळ जातोय ना त्यात. त्यांनी वेळ घालावा, अशी खोचक टीका करतानाच हे सरकार उरलेला तीन वर्षाचा काळ अगदी व्यवस्थितपणे पार पाडेल. त्यामुळे या काळात तरी कुणी पुन्हा येण्याची अजिबात शक्यता नाही. आणि भविष्यातही आजचीच व्यवस्था कायम राहील ही मला खात्री आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले (Sanjay Raut said, “I am sure that today’s system will continue in the future as well).

Video : राजकारणातील भीष्माचार्य हरपला

Mumbai: Sharad Pawar is the Bhishma Pitamah of opposition, says Sanjay Raut

पक्ष चालवण्याचे अँग्रीमेंट नाही

सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे का?, असा सवालही त्यांना करण्यात आला. हा समन्वय काय असतो? तीन पक्ष स्वतंत्रपणे काम करत आहेत. करत राहतात. प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने वाढत असतो. शरद पवार यांनी मागे त्याला एक उत्तर दिले आहे. ते अधिक समर्पक आहे. आम्ही सरकार चालवण्याचं अॅग्रीमेंट केलं आहे. पक्ष एकत्र चालवण्याची आमची भूमिका नाही. प्रत्येकाने आपआपले पक्ष चालवावेत आणि वाढवावेत. आणि प्रत्येकाल तो अधिकार आहे. जेव्हा शिवसेना-भाजपची युती होती. तेव्हा दोन्ही पक्ष शतप्रतिशतचे नारे देत होते. त्यात चुकलं काय, असा सवाल राऊत यांनी केला (Sanjay Raut said, we have agreed to run the government. It is not our role to run the party together).

शिवसेनेचा जिल्हा म्हणून ओळख व्हावी

संपूर्ण राज्यात गावपातळीवर शिवसेनेचं संपर्क अभियान सुरू आहे. त्याच्या समारोपाचा हा काळ आहे. जरी सरकार आमचे असले तरी पक्षाचे संघटन अधिक मजबूतीने काम करताना दिसलं पाहिजे. ही या मागची भावना आहे. शंकरराव गडाख आल्यापासून या जिल्ह्यात संघटन वाढत आहे. शिवसेनेचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख व्हावी हा प्रयत्न आहे, असे संजय राऊत म्हणाले (Sanjay Raut said, Shiv Sena’s liaison campaign is going on at village level in the entire state).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी