30 C
Mumbai
Wednesday, May 15, 2024
Homeसिनेमाबिग बॉसच्या घरातील पुरुष दिसणार स्त्री वेशात, ‘फॅशन शोभेल तुला’ बोलत दादुसच्या...

बिग बॉसच्या घरातील पुरुष दिसणार स्त्री वेशात, ‘फॅशन शोभेल तुला’ बोलत दादुसच्या ऑर्केस्ट्रावर थिरकणार स्पर्धक

 टीम लय भारी 

मुंबई : बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात कमाल झाली आहे. 5 दिवसातच स्पर्धकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधायला सुरुवात केली आहे. आता पर्यंत 2 टास्क झाले आहेत. आता ह्या घरात आणखीन एक मजेशीर टास्क येणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील पुरुष स्त्री वेशभूषा परिधान करणार आहेत. त्यामुळे हा भाग पाहणे मजेशीर ठरणार आहे (Bigg Boss Marathi house Men  wear female costumes).

कीर्तनकार शिवलीला ताई बिग बॉसच्या घरात, जाणून घ्या त्यांच्या नावामागची कहाणी

‘अल्ट्रा मीडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंट’ आणणार वर्षभरात १० मराठी चित्रपटांचा नजराणा

कलर्स मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर या नव्या टास्कचा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये बिग बॉसच्या घरात दादुस ऑर्केस्ट्रा भरणार आहे. ‘फॅशन शोभेल तुला’ या अंतर्गत घरातील पुरुष स्त्री वेशात दिसणार आहेत. ह्या प्रोमोमध्ये विकास पाटील आणि उत्कर्ष शिंदे नऊवारी साडीमध्ये दिसत आहेत (Bigg Boss Marathi house to fill Dadus Orchestra).

Bigg Boss Marathi house Men wear female costumes
विकास पाटील आणि उत्कर्ष शिंदे नऊवारी साडीमध्ये

‘रंगकर्मींच्या कामी न येणारं सांस्कृतिक खाते तात्काळ बंद करावे’ अशी मागणी करत २७ सप्टेंबरला रंगकर्मींचे ‘पितृस्मृती आंदोलन’

Bigg Boss 15 Contestants List: Karan Kundrra, Tina Dutta and other to join Salman Khan’s show | Tv News – India TV (indiatvnews.com)

 पुरुष स्त्रियांप्रमाणे साडी नेसून साजशृंगार करणार आहेत हे तर दिसतच आहे. परंतु या नव्या टास्कमध्ये महिला स्पर्धक पुरुष वेशात दिसणार, असे म्हटले जात आहे. हा व्हीडियो सोशल मिडीयावर चांगलाच गाजत आहे (Vikas Patil and Utkarsh Shinde are seen in a nine-way saree).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी