31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeसिनेमा‘सना खान’चा फिल्म इंडस्ट्रीला अलविदा, आता मौलाना मुफ्ती अनसशी निकाह

‘सना खान’चा फिल्म इंडस्ट्रीला अलविदा, आता मौलाना मुफ्ती अनसशी निकाह

टीम लय भारी

मुंबई l बॉलिवूड अभिनेता सलमान खानची कोस्टार आणि बिग बॉसची स्पर्धक सना खानने काही दिवसांपूर्वी इस्लामसाठी चित्रपटसृष्टी सोडत असल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले. तिच्या या निर्णयानंतर अनेकांना धक्का बसला. आता सनाने निकाह केल्याचे समोर आले आहे.

 

सना खानने गुजरातचे मौलाना मुफ्ती अनसशी निकाह केले आहे. तिच्या लग्नातील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये सना खान आणि मुफ्ती अनस हे पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहेत. सना या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. दरम्यान त्यांनी केक देखील कापला आहे. सध्या त्यांचा  व्हिडीओ चर्चेत आहे.

 

सना खानने बिग बॉसच्या सहाव्या सिझनमध्ये भाग घेतला होता. प्रसिद्ध कोरिओग्राफर मेल्विन लुईसची ती गर्लफ्रेंड होती. मात्र काही दिवसांपूर्वीच त्या दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर तिने मेल्विनवर अनेक आरोपसुद्धा केले होते. त्यानंतर तिने काही दिवसांपूर्वी पोस्ट शेअर इंस्ट्रीसोडत असल्याचे सांगितले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी