31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमुंबईवसई समुद्रकिनाऱ्यावर एकाच आठवड्यात 2 मृतदेह

वसई समुद्रकिनाऱ्यावर एकाच आठवड्यात 2 मृतदेह

मृगा वर्तक : टीम लय भारी

पालघर :- पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात गेल्याच आठवड्यात विवाहितेचा बुडून मृत्यू झालेला होता. त्यानंतर चारच दिवसांनी काल पुन्हा एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला आहे (A body has been found on Vasai beach).

वसई किल्ल्यातील किल्लाबंदर खाडीजवळील जेट्टीवर बुधवारी संध्याकाळी एक अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला. त्याच्या हातावर निलेश असे नाव गोंदवलेले आहे. कोणत्याही प्रकारची ओळखपत्रे किंवा मोबाईल फोन मृतदेहाच्या सोबत आढळला नाही. तसेच कोणत्याही प्रकारची मिसिंग कंपलेंट वसई ठाण्यात दाखल झाली नव्हती.

काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन, वाढदिवसा दिवशीच घेतला जगाचा निरोप

आदित्य ठाकरेंचा ‘या’ नव्या योजनेला ग्रीन सिग्नल

पुरुषाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सध्या पोलिसांसमोर त्या पुरुषाची ओळख पटविणेचे आव्हान आहे. हा एक अपघात होता किंवा खून होता किंवा आणखी काही याचा शोध वसई पोलीस घेत आहेत (Vasai police are investigating whether it was an accident or a murder or something else).

प्रवीण दरेकरांची आघाडी सरकारवर घणाघात टीका; सत्ताधारी पक्षांना फक्त स्वबळाची काळजी

Maharashtra: Car floats 7km away as occupants defy curfew, party on vasai beach

A body has been found on Vasai beach
वसईचा समुद्र

11 जुलैला याच समुद्रावर एक विवाहित महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर लगेच 4 दिवसांनी हा मृतदेह सापडल्याने यांचे एकमेकांशी काही संबंध आहेत का याचाही शोध पोलीस घेत आहेत. सदर महिलेचा विवाह 2 महिन्यांपूर्वीच झाला होता आणि ती वसई पूर्वेकडील एव्हरशाईन भागात राहणारी होती. सकाळी मॉर्निंगवॉकसाठी बाहेर पडून ती समुद्रकिनारी कशी पोहोचली हा सुद्धा प्रश्न आहेच. महिलेचे नाव ममता पटेल असे होते व वय 30 वर्षे इतके होते. मूळची गुजरातची रहिवासी असून सध्या वसईत राहत होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी