30 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीयराज्यपालांविरोधात महाविकास आघाडी सरकारचे शिर्षासन आंदोलन

राज्यपालांविरोधात महाविकास आघाडी सरकारचे शिर्षासन आंदोलन

टीम लय भारी

बीड : आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनासारखीच या अधिवेशाची सुरुवात देखील वादळी झाली आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावेळी सभागृहात जोरदार घोषणाबाजी झाल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडीच्या घोषणाबाजी दरम्यान अधिवेशानच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यपाल अभिभाषण अर्ध्यावर सोडून सभागृहातून निघून गेल्याचे पाहायला मिळाले.(Mahavikas Aghadi government’s agitation against the governor)

भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांनी सभागृहात प्रचंड घोषणाबाजी केली. या गोंधळात विधानपरिषद आमदार संजय दौड यांनी सर्वांच लक्ष वेधले. आमदार संजय दौंड यांनी राज्यपालांविरोधात आनोखे आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले.

राज्यपालांचा निषेध करण्यासाठी आमदार संजय दौड यांनी पायऱ्यांवरच खाली खाली डोक आणि वर पाय करत आंदोलन केले. ‘राज्यपालांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा निषेध म्हणून मी शिर्षासन करुन त्यांचा निषेध केला’, अशी प्रतिक्रिया आमदार संजय दौंड यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

विधानसभा अध्यक्ष निवडणूक : आवाजी मतदानास राज्यपालांचा विरोध

राज्यपाल कोश्यारींचा सोलापुर दौरा शिवभक्ताकडून रोखण्याचा इशारा

सेवानिवृत्त अधिका-यांच्या नेमणूक रद्द न करता राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केलेले लक्ष्य

https://indianexpress.com/article/explained/explained-controversy-maharashtra-governor-remark-shivaji-maharaj-7796049/

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी