31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमुंबईशर्मिला ठाकरे यांच्या गाडीला अपघात

शर्मिला ठाकरे यांच्या गाडीला अपघात

नवी मुंबई :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. राज ठाकरे आज एकविरा देवीच्या दर्शनासाठी आपल्या कुटुंबासह गेले होते. राज आणि शर्मिला वेगवेगळ्या गाडीतून प्रवास करीत होते. दर्शन घेऊन परतत असताना सानपाड्याजवळ हा अपघात झाला. एक रिक्षा अचानक आडवी आली. रिक्षाला वाचविण्यासाठी चालकाने गाडी वेगाने दुसरीकडे वळविली. त्यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्यातून हा अपघात झाला. यात शर्मिला ठाकरे किरकोळ जखमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

शर्मिला ठाकरे यांच्या गाडीला अपघात

शर्मिला यांच्या गाडीमध्ये राज यांच्या बहिण व त्यांचे सचिव सचिन मोरे होते. अपघात झाला तेव्हा राज यांचा ताफा बराच पुढे निघून गेला होता. अपघात झाल्याचे समजताच राज यांनी आपली गाडी थांबविली. त्यानंतर शर्मिला ठाकरे यांना दुसऱ्या गाडीतून मुंबईला पाठविण्यात आले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी