33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमुंबईन्यायप्रविष्ठ प्रकरण बसविले धाब्यावर, जात पंचायतीचे मनमानी आदेश

न्यायप्रविष्ठ प्रकरण बसविले धाब्यावर, जात पंचायतीचे मनमानी आदेश

टीम लय भारी

नवी मुंबई :- देशात न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालय आहेत. न्याय मिळवून देण्यासाठी न्यायव्यवस्था सक्षम आहे. पण एखाद्या प्रकारणाचा न्याय हा त्याच्यावर दबाव आणून तो जातपंचायती मध्ये सोडवावा असे करणे कितपत योग्य आहे. अशीच एक घटना नवी मुंबई, उलवे येथे राहणाऱ्या व्यक्तीसोबत घडली आहे (Arbitrary order of caste panchayat on the basis of justifiable case).

रोहन राजू गरुड असे या व्यक्तीचे नाव आहे. उलवे येथे राहणारा रोहन गरुड यांनी घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे (Rohan Garud has filed for divorce in the court). मात्र, या घटस्फोटाचा न्याय निवडा गोंधळी समाजाच्या जात पंचायतीमध्ये केला जावा असा दवाब गरुड कुटुंबावर आणला जात होता. या प्रकरणाचा निर्णय गोंधळी जातपंचायती मध्ये केला जाईल. असे न केल्यास तुमच्यावर बहिष्कार टाकला जाईल, वाळीत टाकेल जाईल, मारहाण, आणि दंड आकारण्यात येईल.

पुण्याच्या दाम्पत्याचा शोध, कोरोनाचा जन्म प्रयोगशाळेतच!

‘हे खपवून घेणार नाही’, निलेश लंकेंचा थेट पडळकरांना इशारा

अन्न पाणी बंद केले जाईल. अशा धमक्या गेल्या सहा महिन्यापासून, हेच पाच पंचावन्न वयाची जातपंचायतमधील  लोकांकडून मोबाईल आणि व्हाट्सएद्वारे  देण्यात येत होत्या. यासर्व गोष्टीमुळे गरुड परिवाराला खूप त्रास होऊ लागला होता. त्यामुळे गरुड परिवाराने याबाबत तक्रार करण्याचे ठरवले. गरुड कुटुंबाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितिच्या कार्यकर्त्यांकडे याबाबत तक्रार केली. या घटनेचा  पाठपुरवठा करत समितीच्या कार्यकर्त्यांनी त्वरित रायगड जिल्ह्यातील न्हावा शेवा पोलिस स्टेशनमध्ये गोंधळी समाजाच्या पंचावर सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला (At the police station, Gondhali filed a case against the community judge under the Anti-Social Exclusion Act).

यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव, कार्यकर्ते प्रविण देशमुख, राजीव देशपांडे, राज्य पदाधिकारी व ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक वानखेडे  यांनी या प्रकरणाचा  स्वतः पाठपुरवठा करून गुन्हा दाखल करून घेतला, यात न्हावा शेवाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर भेट यांनी संपूर्ण सहकार्य केले (Nhava Sheva senior police inspector Madhukar Bhet provided full cooperation).

१ जुलैपासून ‘या’ गोष्टी बदलणार…

India reports 48,786 new Covid-19 cases and 1,005 deaths in the last 24 hours

देशात न्याय व्यवस्था असतांना असे प्रकार अजूनही अनेक ठिकाणी घडत आहेत. पाच वयस्कर व्यक्ती मिळून न्याय करतात, त्यांचे निर्णय मान्य न केल्यास मनात येईल ती शिक्षा देतात. आपली मनमानी करून समोरच्या व्यक्तीला मारहाण करण्याच्या धमक्या देतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी