31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूजपुण्याच्या दाम्पत्याचा शोध, कोरोनाचा जन्म प्रयोगशाळेतच!

पुण्याच्या दाम्पत्याचा शोध, कोरोनाचा जन्म प्रयोगशाळेतच!

मृगा वर्तक : टीम लय भारी

मुंबई :- पुण्याच्या मराठमोळ्या दाम्पत्याने कोरोना विषाणूविषयी असे काही पुरावे शोधून काढलेत, जे कोरोना विषाणू प्रयोगशाळेतूनच निर्माण केला गेला यावर प्रकाश टाकतात (Pune couple discovered, Corona born in laboratory).

डॉ. मोनाली राहाळकर आणि डॉ. राहुल बहुलीकर यांनी ताळेबंदीच्या काळात कोरोनाची पाळेमुळे शोधण्याचा चंगच बांधला. डॉ. मोनाली यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सर्वप्रथम कोरोना सदृश आजार शोधून काढले. RATG13 हा आजार बराच कोरोना विषाणूशी मिळता जुळता होता (The disease was closely related to the corona virus).

‘हे खपवून घेणार नाही’, निलेश लंकेंचा थेट पडळकरांना इशारा

दगडफेकीनंतर पडळकर आक्रमक, आरोपीसोबत रोहित पवारांचा फोटो शेर…

अभ्यासादरम्यान त्यांच्या लक्षात आले की, दक्षिण चीन मध्ये मोजीयांग भागात काही तांब्याच्या खाणी काम चालू असताना अर्धवटच बंद केल्या गेल्या. तिथे काम करणाऱ्या 6 कामगारांना कोरोनाची सगळी लक्षणे दिसली आणि काही दिवसांतच ती काम करू शकली नाहीत. ही घटना 2012 मध्ये घडली त्यानंतर त्या 6 कामगारांना दवाखान्यात दाखल करण्यात आले त्यापैकी 4 कामगारांचा न्यूमोनियाने मृत्यू झाला.

१ जुलैपासून ‘या’ गोष्टी बदलणार…

Coronavirus India Latest Update Live: Delhi reports below 100 new Covid-19 cases; Cadila expects to produce 1 crore ZyCoV-D vaccine doses/month from August

वॉल स्ट्रीट जर्नल अनुसार त्या खाणी मध्ये बरीच वटवाघळे होती. त्यांची विष्ठा सुकल्यानंतर ती धुळीत मिसळते आणि त्यापासून हा आजार होत होता. ट्विटर वर या प्रबंधबद्दल डॉ. राहुल यांनी ट्विट केल्यानंतर एका चिनी तरुणाने तशाच एका अभ्यासाबद्दल विचारपूस केली. चिनी डॉ. नानशन यांनी प्रश्न विचारल्याबरोबर उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी