35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमुंबईसनदी अधिकारी मिलिंद आणि मनिषा म्हैसकर यांच्यावर मधमाशांचा हल्ला

सनदी अधिकारी मिलिंद आणि मनिषा म्हैसकर यांच्यावर मधमाशांचा हल्ला

टीम लय भारी

मुंबई: सनदी अधिकारी मिलिंद आणि मनिषा म्हैसकर यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला आहे. नाशिकमधील अंजनेरी भागात ट्रेकसाठी गेले असता त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. मनिषा म्हैसकर यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे (Bees have been attacked on officer Milind and Manisha Mhaiskar).

मिलिंद म्हैसकर सर्वात पुढे असल्याने त्यांच्यावर मधमाशांचा हल्ला जास्त झाला. दरम्यान त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती मनिषा म्हैसकर यांनी दिली आहे.

गल्लीपासून दिल्लीपर्यंत पेट्रोल दरवाढीविरुद्ध रणकंदन करणारे भाजपचे नेते आता मूग गिळून गप्प

Income Tax: करबचत करण्याचे सहा प्रभावी मार्ग, जाणून घ्या एका क्लिकवर

मनिषा म्हैसकर यांनी फेसबुक पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “अंजनेरी भागात मॉर्निग वॉकसाठी गेले असता मिलिंद सर्वात पुढे चालत होते. काही वेळाने मिलिंद यांनी मागे वळून मला तिथून धाव घेण्यास सांगितलं. मधमाशांनी हल्ला केला आहे हे समजण्यास मला थोडा वेळ लागला. मी माझ्याकडची शाल त्यांच्याकडे फेकली. पण मधमाशांच्या हल्ल्यात त्याची फारशी मदत झाली नाही”.

पोस्ट ऑफिसच्या योजनेत महिन्याला 500 रुपये गुंतवा, मिळवा 7.1 टक्के व्याज

Mumbai News Live Updates: Maharashtra records lowest covid-19 cases in 17 months

मिलिंद म्हैसकर मधमाशांपासून सुटका घेण्याचा प्रयत्न करत असतानाच तिथे उपस्थित काहीजणांनी प्रसंगावधान दाखवत मनिषा म्हैसकर यांच्या दिशेने शॉल आणि कोट फेकले. यामुळे त्यांचा बऱ्यापैकी बचाव झाला. यानंतर एका व्यक्तीने आग आणि धुराच्या सहाय्याने मधमाशांपासून सुटका करुन घेण्यात मदत केली.

chitra wagh

संबंधित व्यक्तीला मधमाशांच्या हल्ल्याबद्दल माहिती असल्याने त्यांनी मिलिंद यांना प्रथमोपचारासाठी मदत केली. दरम्यान म्हैसकर दांपत्य या हल्ल्यातून बचावलं असून मिलिंद यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती मनिषा म्हैसकर यांनी दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी