32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमुंबईमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आप्पासाहेब धर्माधिकारींवर गुन्हा दाखल करा; खारघर उष्माघात मृत्यूप्रकरणी याचिकेवर हायकोर्टात...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आप्पासाहेब धर्माधिकारींवर गुन्हा दाखल करा; खारघर उष्माघात मृत्यूप्रकरणी याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार

खारघर येथे 16 एप्रिल रोजी उष्माघाताने 13 लोकांचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण आता मुंबई हायकोर्टात पोहचल आहे. अॅड. नितीन सातपुते यांनी याबाबत जनहित याचिका दाखल केली आहे. या जनहित याचिकेची मुंबई हायकोर्टाने आज दखल घेतली. त्यावर आता 8 जून रोजी सुनावणी होणार आहे.

खारघर येथे 16 एप्रिल रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. यावेळी आप्पासाहेब यांचे लाखो अनुयायी कार्यक्रमाला आले होते. मात्र, हे लाखो अनुयायी खुल्या मैदानात होते. त्या दिवशी तापमान 42 डिग्री होते. त्यामुळे उष्माघाताने 13 जणांचा बळी गेला.

लोकांचा मृत्यू झाल्याने आयोजकांवर टीका केली जात आहे. याचे आयोजक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आदी आहेत. या कार्यक्रमाच्या भोंगळ नियोजनावर गेली 10 दिवस सतत टीका होत आहे. याची दखल घेऊन राज्य सरकारने या घटनेच्या चौकशीसाठी एक सदस्य समितीची नेमणूक केली आहे. त्यानंतर आता हे प्रकरण मुंबई हायकोर्टात पोहचल आहे. या प्रकरणात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका अॅड. नितीन सातपुते यांनी दाखल केली आहे.

या याचिकेत गंभीर स्वरूपा मागण्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सह कार्यक्रम आयोजित करणाऱ्या सर्वांवर गुन्हा दाखल करावा. हा गुन्हा भादवी 269, 270, 271, 302 आणि 304(2) या नुसार दाखल करण्यात यावा. त्याच प्रमाणे इतर सरकारी अधिकारी यांनाही आरोपी करण्यात यावे. 14 कोटी रुपये वसूल करण्यात यावे. आप्पासाहेब यांच्या कडून ही पुरस्काराची रक्कम काढून घेण्यात यावी. हे पैसे मयताच्या नातेवाईकांना वाटण्यात यावेत. 10 लाख लोक उन्हात तळपत होते. यावेळी राजकारणी एसी शामियानात मजा करत होते. चांगलचुंगलं खात होते. यामुळे राजकारणी आणि सरकारी अधिकारी हेच या 13 जणांच्या मृत्यूला जबाबदार आहेत. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अॅड. नितीन सातपुते यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 11 वाहनांचा विचित्र अपघात

Whatsapp वापरकर्त्यांसाठी जबरदस्त अपडेट; आता चार मोबाईलमध्ये चालणार एक अकाउंट! जाणून घ्या कसे

अभिनेत्री ख्रिसन परेरा आज भारतात परतणार

या जनहित याचिकेवर आज हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. यावेळी अॅड. सातपुते यांनी ही जनहित याचिका किती महत्वाची आहे. याबाबत युक्तिवाद केला. तो मुख्य न्यायमूर्ती गंगापूरवाला यांनी मान्य केला आणि तुमची याचिका ऐकली जाईल. त्यावर 8 जून रोजी सुनावणी होईल, अस म्हणाले. त्यामुळे या याचिकेवर आता जून महिन्यात सुनावणी होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी