31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
HomeWhatsapp वापरकर्त्यांसाठी जबरदस्त अपडेट; आता चार मोबाईलमध्ये चालणार एक अकाउंट! जाणून घ्या...
Array

Whatsapp वापरकर्त्यांसाठी जबरदस्त अपडेट; आता चार मोबाईलमध्ये चालणार एक अकाउंट! जाणून घ्या कसे

व्हॉट्सॲपने नुकतेच मल्टीपल डिव्हाईस सपोर्ट लाँच केलं आहेत. यामुळे आता वापरकर्त्यांना एकच अकाउंट चार फोनमध्ये वापरता येणार आहे. याअगोदर एकच अकाउंट एक फोनमध्ये आणि वेब व्हॉट्सअपद्वारे पीसीवरती वापरता येत होते, आता चार फोनमध्ये एकच अकाउंट वापरता येणार आहे.

WhatsApp जगभरात प्रसिद्ध असणारे मेसेजिंग ॲप. मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी हे फिचर लाँच करण्याची घोषणा केली आहे. आजपासून तुम्ही एकच व्हॉट्सॲप अकाउंट चार फोनमध्ये वापरु शकता, असं काल मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितलं आहे. नवीन फीचरमुळे जास्तीत जास्त चार डिव्हाइसवर तुमचे अकाउंट वापरता येऊ शकते. ज्यामध्ये स्मार्टफोन, पीसी आणि टॅबलेटचा समावेश आहे. व्हॉट्सॲपचे हे फीचर एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह आले आहे. म्हणजेच अनेक डिव्हाईमध्ये तुम्ही व्हॉट्सॲपचे अकाउंट वापरु शकता.

१. तुमच्याकडे अँड्रॉइड स्मार्टफोन असल्यास तुम्ही गुगल प्ले स्टारवरून व्हॉट्सॲपची नवीन सिरीज डाउनलोड करून घ्या. तसेच जर का तुम्ही आयफोन वापरकरते असाल तर Apple स्टोअरवर जाऊन व्हॉट्सॲप डाउनलोड किंवा अपडेट करू शकता.
२. व्हॉट्सॲप अपडेट किंवा डाउनलोड केल्यानंतर इतर डिव्हाइसवर whatsapp ओपन करावे. त्यामध्ये तुम्हाला तुमचा कंट्री कोड व फोन नंबर टाकण्याचा पर्याय दिसेल.
३. तो पर्याय दिसला की वरील बाजूस उजव्या कोपऱ्यामध्ये तीन डॉट्स दिसतील तिथे क्लिक करा. त्यानंतर ‘लिंक न्यू डिव्हाईस’ वर क्लिक करा.
४. आता, तुम्हाला मध्यभागी व्हॉट्सॲपच्या लोगोसह एक मोठा बारकोड दिसेल.
५. त्यानंतर तुम्ही तुमचे अकाउंट जिथे सुरु आहे त्या प्रायमरी अकाउंटवर जा. वरील उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करून नंतर लिंक केलेलं डिव्हाइसेस सिलेक्ट करा.
६. तसेच वरीलप्रमाणे करून झाले की नवीन डिव्हाईस लिंक करा आणि दुसऱ्या डिव्हाइसवरील बारकोड सिलेक्ट करा.

या स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुम्ही तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट इतर चार डिव्हाइसवर Acess करू शकता. इंटरनेट स्पीड आणि तुमच्या व्हॉट्सॲप किती कन्टेन्ट आहे यावर अकाउंट सुरु किंवा लोड होण्यास काही मिनिटांचा अवधी लागू शकतो. त्याचप्रमाणे अकाउंट एखाद्या डिव्हाइसवरून बंद करायचे असेल तर तुम्ही तुमच्या प्रायमरी फोन क्लिक करून लिंक डिव्हाईस मेनूवर क्लिक करावे आणि लॉगआऊट पर्यायाची निवड करून अकाऊंट बंद करू शकता.

हे सुद्धा वाचा : 

WhatsApp वर दिसणार ‘हे’ पाच नवे मजेदार फिचर्स, वाचा….

Whatsapp Features : व्हॉट्सऍपवरील आपत्तिजनक फोटो, व्हिडिओ असे करू शकता ब्लॉक

112 महाराष्ट्र: आता पोलिसांकडे व्हॉट्स ॲपनेही तक्रार करता येणार; सोशल मीडियातूनच मिळवा तातडीची मदत!

Whatsapp Update, one whatsapp account in four devices, New whatsapp feature, Whatsapp Update one account will work in four devices

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी