29 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeक्राईमअभिनेत्री ख्रिसन परेरा आज भारतात परतणार

अभिनेत्री ख्रिसन परेरा आज भारतात परतणार

सडक 2 या चित्रपटाची अभिनेत्री ख्रिसन परेरा हि अंमली पदार्थ बाळगळ्याच्या गुन्ह्यात शारजा जेल मध्ये अटकेत होती.तिची काल सुटका करण्यात आली आहे.आज तिला तिचा पासपोर्ट परत दिला जाणार आहे.त्यानंतर आजच ती भारतात परतणार.

नुकताच प्रदर्शित झालेल्या सडक २ चित्रपटात अभिनेत्री क्रिसन‌ला परेरा ही महत्वाच्या भूमिकेत होती.तिच्या कामाची चर्चा ही झाली.या ख्रिसन परेरा हिला अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी शारजा विमानतळावर अटक करण्यात आली होती.ती शारजा इथल्या जेल मध्ये होती. मात्र, तिचा कोणताही संबध अंमली पदार्थाच्या तस्करी शी नाही.तिला फसवण्यात आल्याचं तिच्या पालकांचं म्हणणं होतं. एक एप्रिल रोजी वेबसिरिजच्या कामासाठी ख्रिसन शारजाला जाणार होती.यावेळी आरोपी अनथोनी याने तिला एक ट्रॉफी दिली.त्या ट्रॉफी मध्ये गांजा हा अंमली पदार्थ लपवला होता.ख्रिसन शारजा विमानतळ येथे पोहचल्यावर तिच्या सामानाची तपासणी करण्यात आली. यावेळी तिच्या जवळच्या ट्रॉफीमध्ये गांजा सापडला.यामुळे तिला तिथल्या पोलिसांनी अटक केली.तिला जेल मध्ये ठेवण्यात आलं होत.

प्रत्यक्षात गांजाशी क्रिसन हिचा काही संबंध नाही.आरोपी अनथोनी याच ख्रिसनच्या आईशी वाद आहे.या पूर्ववैमनस्यातून अँथोनीने ख्रिसनला अडकवल्याचा पोलिसांचा दावा आहे.ख्रिसनला शारजा येथे अटक केल्यानंतर तिला ट्रॉफी देणाऱ्या अनथोनी यांच्या विरोधात क्रिशन हिच्या आईने मुंबई पोलिसांकडे तक्रार केली.यानंतर हा तपास मुंबई क्राइम ब्रांचच्या युनिट 10 कडे देण्यात आला.युनिट 10च्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून आज अनथोनी पॉल आणि राजेश बोभाटे यांना अटक केली.कारण यांनीच क्रिशन हिला ट्रॉफी दिली होती.त्यात गांजा लपवला होता.याच मुद्यांच्या आधारावर त्यांना अटक करण्यात आली आहे.
अनथोनी पॉल आणि राजेश बोभाटे यांचे जबाब व्हिडिओ रेकॉर्डिंग करून शारजातील भारतीय आणि तिथून पुढे शारजाच्या पोलिसाकडे पाठवलं गेलं.ते पुरावे त्यांनी मान्य केले.यानंतर काल ख्रिसन हिची सुटका करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

खारघर उष्माघात प्रकरणी आम आदमी पक्षाची कोर्टात धाव

बारसू रिफायनरी प्रकल्प: ठाकरेंनी त्यावेळेस का विरोध केला नाही? मुख्यमंत्र्यांचा खोचक सवाल

तृतीयपंथी विद्यार्थ्यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

 

या आधी देखील बोरीवली मधील एका डी जेला अश्याच प्रकारे पूर्व वैमनस्यातून अनथोनी याने अडकवल होत.क्लेटन रॉड्रिग्ज नावाचा डी जे देखील आहे शारजा पोलिसांच्या ताब्यात आहे. आणखीनही लोकांना अश्याच प्रकारे अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हे शाखेला संशय आहे.ख्रिसन हिच्या सुटकेनंतर आता रोड्रिग्ज यांच्या सुटकेसाठी मुंबई पोलीस प्रयत्न करणार आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी