30 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 11 वाहनांचा विचित्र अपघात

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 11 वाहनांचा विचित्र अपघात

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 11 वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला आहे. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला आहे. या महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच आहे. अपघातामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला असून पोलिसांकडून वाहतूक व्यवस्था मार्गी लावण्याचे काम सुरु आहे. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातामुळे मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वाहतुक व्यवस्था ठप्प झाल्याची माहिती मिळत आहे. अपघात झालेल्या वाहनांमध्ये कार, ट्रक, अवजड वाहनांचा समावेश असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातामध्ये सहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी प्रवाशांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करुन उपचार करुन पाठविण्यात आले असून एका जखमीला पुण्यातील ससुन रुग्णालयात हलविण्यात आले आहे.


इलेमा आशु, हर्षदा घाणेकर, कुंदा सोनवने, कमल सोनावने, सदानंद भोईर आणि मॅथ्थू थॉमस हे प्रवासी या अपघातामध्ये जखमी झाले आहेत. जखमींमधील मॅथ्थू थॉमस या प्रवाशाला पुण्यातील ससुन रुग्णालयात हलविण्यात आल्याचे वृत्त आहे.

 

 

हे सुद्धा वाचा 
Whatsapp वापरकर्त्यांसाठी जबरदस्त अपडेट; आता चार मोबाईलमध्ये चालणार एक अकाउंट! जाणून घ्या कसे

अभिनेत्री ख्रिसन परेरा आज भारतात परतणार

तृतीयपंथी विद्यार्थ्यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

दरम्यान अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलीस, देवदूत यंत्रणा, आयआरबी टीमने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले आहे. एका ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने अथवा चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हा ट्रक मुंबईच्या दिशेने येत होता.  या ट्रकने वाहनांना धडक दिली. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी