34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमुंबईचित्रा वाघ नरेंद्र मोदींवर भडकल्या, गॅस दरवाढीवरून जाम संतापल्या !

चित्रा वाघ नरेंद्र मोदींवर भडकल्या, गॅस दरवाढीवरून जाम संतापल्या !

टीम लय भारी

मुंबई : देशात पुन्हा एकदा महागाईने डोके वर काढले आहे. केंद्राकडून पुन्हा गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. बुधवारी (दि. ६ जुलै २०२२) ऑइल मार्केटींग कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडर (LPG Cylinder) मध्ये सरळ ५० रुपयांनी वाढ केली आहे. तर पाच किलोच्या छोट्या सिलेंडरमध्ये १८ रुपयांनी वाढ झाली आहे.

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आता भाजपमध्ये असलेल्या चित्रा वाघ यांचा त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असतानाचा एक व्हिडीओ सांगलीतील पत्रकार राजू थोरात यांच्याकडून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये चित्रा वाघ या गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानंतर चांगल्याच भडकल्या असल्याचे दिसून येत आहे. पण आता चित्रा वाघ स्वतः भाजपमध्ये असल्याने त्या महागाई किंवा अन्य कोणत्याही मुद्द्यावर फारशा बोलताना दिसून येत नाहीत. त्यामुळेच त्यांना याबाबतची आठवण करून देण्यासाठी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओमध्ये चित्रा वाघ नरेंद्र मोदी यांना महागाई आणि गॅस सिलेंडरच्या दर वाढीबाबत बोलताना दिसत आहेत. त्याचबरोबर चित्र वाघ यांनी युपीए सरकार आणि एनडीए सरकार यांची तुलना केली. युपीए सरकारच्या काळात गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानंतर कशा प्रकारे स्मृती इराणी आणि स्वतः नरेंद्र मोदी त्याचा विरोध करायचे हे देखील त्यांनी सांगितले आहे.

पण आता गॅसचे दर हजार रुपयांच्या वर गेलेले असताना सुद्धा चित्र वाघ यांच्या तोंडातून एक अक्षर पण निघत नसल्याने या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना याबाबतची आठवण करून देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा :

शंभूराज देसाई म्हणाले, आमचा उठाव दोन वर्षांपूर्वीच व्हायला हवा होता

Breaking : राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगर पंचायतींच्या निवडणुका जाहिर

राज्यपालांची सुचना, वि. दा. सावरकर यांचे नाव मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहाला द्या

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी