33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
HomeमुंबईCyclone Nisarga : निसर्ग चक्रीवादळाने दिशा बदलल्याने मुंबईचा धोका टळला

Cyclone Nisarga : निसर्ग चक्रीवादळाने दिशा बदलल्याने मुंबईचा धोका टळला

टीम लय भारी

मुंबई : कोरोना व्हायरसशी (Coronavirus) सामना करणा-या महाराष्ट्रावर निसर्ग चक्रीवादळाचे (Cyclone Nisarga) संकट उभे ठाकले आहे. निसर्ग चक्रीवादळ सिंधुदुर्ग, रत्नागिरी मार्गे अलिबागच्या समुद्रकिना-यावर बुधवारी दुपारी धडकले.

पुढील काही तासात हे वादळ (Cyclone Nisarga) मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यातून जाणार असल्याची माहिती दिली जात होती. मात्र चक्रीवादळाने दिशा बदलत आता पनवेल, कर्जत, खोपोली मार्गे नाशिककडे सरकल्याने मुंबईचा धोका टळला आहे.

Cyclone Nisarga : निसर्ग चक्रीवादळाचे रौद्ररुप, कोकणात तांडव!

दरम्यान, या चक्रीवादळाने (Cyclone Nisarga) सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात मोठे नुकसान झाले असून अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. झाडे उन्मळून पडली असून वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वीज खंडीत झाली आहे. या भागातील दळणवळण व्यवस्था ठप्प झाली आहे.

निसर्ग चक्रीवादळाचे (Cyclone Nisarga) रौद्र रूप दाखवणारे सॅटेलाइट दृष्य हवामान विभागाने बुधवारी सकाळी जारी केले होते. हे वादळ पुढील काही तासांत ताशी ११० ते १२० किलोमीटर वेगाने रायगड जिल्ह्यात समुद्र किनारी धडकण्याची शक्यता व्यक्ती करण्यात आली. भूपृष्ठावर शिरकाव केल्यानंतर हे वादळ हाहाकार माजवण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.

त्यानुसार बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ (Cyclone Nisarga) अलिबाग आणि श्रीवर्धन जवळ किनारपट्टीवर धडकले. वादळ धडकल्यानंतर ताशी १०० ते १२० किलोमीटर चक्रीकार वारे वाहून मुसळधार पाऊस पडत होता.

वादळ (Cyclone Nisarga) जसजसे पुढे सरकत होते तसतसा वा-याचा वेगही वाढत चालला होता. सकाळी ८.३० च्या नोंदीनुसार रत्नागिरीत ५५ किमी वेगाने वारे वाहत होते. त्याचवेळी कोकण किनारपट्टीवर वा-यांचा वेग ताशी ५५ ते ६५ किमी इतका होता.

दुपारी हा वेग आणखी वाढून १०० ते ११० किमीपर्यंत गेला. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर सोसाट्याच्या वा-यासह पाऊस पडत होता. काही भागांत मुसळधार पाऊस सुरू होता.

निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी दुपारी रायगड जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला. ताशी ११० किमी वेगाने धावणा-या वा-यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. वादळामुळे रायगड जिल्ह्यातील काही भागात मोबाईल सेवा खंडित झाल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. किनारपट्टी भागात चक्रीवादळाने आक्राळ विक्राळ रुप धारण केले असून, धडकी भरावी, असा वा-याचा वेग होता.

विमान धावपट्टीवरून घसरले, विमान सेवा ठप्प

बंगळुरवरून मुंबईला आलेले फेडएक्स कंपनीचे मालवाहू विमान बुधवारी धावपट्टीवरून घसरले. निसर्ग वादळामुळे मुंबई आणि परिसरात सोसाट्याचा वारा सुरू आहे, त्यामुळे खराब हवामानात विमान धावपट्टीवरून खाली उतरले. मात्र, मोठा अपघात टळला. मुंबई आंतरराष्ट्रीय विमान लिमिटेड प्रशासनाने ही माहिती दिली. या दुर्घटनेनंतर सायंकाळी ७ वाजेपर्यंत विमान सेवा बंद ठेवण्यात आली.

गुजरातमधील ५० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

दक्षिण गुजरातच्या किनारी भागांत राहणा-या सुमारे ५० हजार लोकांना आणि दमणमधील सुमारे चार हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली आहे. गुजरातच्या किनारी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच लोकांना आपल्या घरामध्येच सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

Cyclone Nisarga : मुंबईत पाऊस, बीकेसीच्या कोविड सेंटरला चक्रीवादळाचा धोका; रुग्णांना हलवले!

Cyclone Nisarga : हायअलर्ट जारी; निसर्ग चक्रीवादळ मुंबई किनारपट्टीवर धडकणार; ‘या’ भागाला धोका?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी