31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रप्रकाश आंबेडकरांना धक्का,’या’ दोन माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

प्रकाश आंबेडकरांना धक्का,’या’ दोन माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

टीम लय भारी

अकोला : भारिप-बमसंचे दोन वेळा आमदार राहिलेले हरिदास भदे व बळीराम सिरस्कार यांनी आपल्या समर्थकांसह काही महिन्यांपूर्वी वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिली होती. या दोन्ही माजी आमदारांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित प्रवेश केला.

भारिप-बमसंचे दोन वेळा आमदार राहिलेले हरिदास भदे व बळीराम सिरस्कार यांनी आपल्या समर्थकांसह काही महिन्यांपूर्वी वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिली होती. दोन्ही आमदारांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना धक्का बसला आहे

माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्याबद्दल…

बळीराम सिरस्कार भारिप-बमसंचे दोन वेळा आमदार राहिलेले आहेत. ते माळी समाजाचे नेते होते. सिरस्कार अकोला जि.प.चे अध्यक्षपद भूषवले असून, बाळापूर मतदारसंघातून दोन वेळा प्रतिनिधित्व केले. त्यांना बुलढाणा लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये तिकीट देण्यात आले होते. त्याठिकाणी पराभव झाल्यानंतर बाळपूरमधून त्यांच्या जागी डॉ.धैर्यवर्धन पुंडकरांना उमेदवारी देण्यात आली.

माजी आमदार हरिदास भदे यांची पार्श्वभूमी…

हरिदास भदे हे भारिप-बमसंचे दोन वेळा आमदार राहिलेले आहेत. भदे यांनी समर्थकांसह काही महिन्यांपूर्वी वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिली होती. हरिदास भदे यांनी अकोला पूर्व मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले. त्यानंतर सलग दोनवेळा त्यांचा पराभव झाला. हरिदास भदे धनगरसमाजाचे नेते आहेत.

प्रकाश आंबेडकरांवर दोन्ही नेते होते नाराज…

प्रकाश आंबेडकरांच्या कामकाजावर, राजकीय निर्णयावर बरेच नेते हे नाराज होवून वंचित आघाडीमधून बाहेर पडत आहे. बी.जी.कोळसे पाटील, लक्ष्मण माने, गोपीचंद पडळकर ह्या नेत्यांनी वंचितपासून फारकत घेतली होती. त्यांनतर माजी आमदार भदे आणि सिरस्कार ह्यांनी पक्षाला रामराम केला.

करोनामुळे प्रवेश रखडला असतांना आज अचानक मुंबई येथील शरद पवार यांच्या निवासस्थानी दोन्ही माजी आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खा. सुनील तटकरे, राहुल डोंगरे आदी उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी