31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमुंबईशिवसेनेचे माजी नगरसेवक धनंजय गावडेंना अटक होणार, अतुल भातखळकरांचे ट्विट

शिवसेनेचे माजी नगरसेवक धनंजय गावडेंना अटक होणार, अतुल भातखळकरांचे ट्विट

टीम लय भारी

मुंबई : मनसुख हिरेन प्रकरणावरून सध्या जोरदार राजकारण सुरु आहे. याप्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ नालासोपा-यातील शिवसेनेचा माजी नगरसेवक आणि सभागृहातील गटनेता धनंजय गावडे याला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. येत्या १५ दिवसांत धनंजय गावडेने पोलिसांसमोर हजर व्हावे, असे कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे गावडेला लवकरच अटक केली जाईल, असे बोलले जात आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी याबाबत ट्वीट केले आहे.

नालासोपा-यातील शिवसेनेचा माजी नगरसेवक आणि सभागृहातील गटनेता धनंजय गावडे याला सर्वोच्च न्यायालयाने १५ दिवसांत पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे खंडणीसह अनेक गुन्हे असलेला आणि सचिन वाझेचा साथीदार असलेल्या गावडेची अटक आता अटळ आहे, असे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे.

बेकायदा बांधकामांना लक्ष्य करून धनंजय गावडेने वसई-विरार भागातील बिल्डरमध्ये दहशत निर्माण केली होती. धनंजय गावडेच्या विरोधात ठाण्यात खंडणी, बलात्कार, फसवणूक असे ८ गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी जामीन मिळावी, यासाठी त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने गावडेवर असलेल्या गंभीर आरोपांची दखल घेत उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे धनंजय गावडे याला जबरदस्त दणका बसला आहे. येत्या १५ दिवसांत पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे त्याला लवकरच अटक करण्यात येईल असे बोलले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी