31 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeराजकीयनवं युती सरकार पडणार की पाडणार? राज्यात भविष्यवाण्यांना आला ऊत

नवं युती सरकार पडणार की पाडणार? राज्यात भविष्यवाण्यांना आला ऊत

लय भारी टीम

मुंबई : नव्या सरकारला आज (दि. 4 जुलै) अधिवेशनात आपले बहुमत सिद्ध करावे लागणार आहे, त्या पार्श्वभमीवर काल घेण्यात आलेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘हे सरकार सहा महिनेच टिकेल, मध्यवर्ती निवडणुकांसाठी तयार राहा’ असे संकेत दिले. दरम्यान यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ही ‘बोगस भविष्यवाणी’ असल्याचे म्हणत टीका केली आहे.

अधिवेशनात बहुमत सिद्ध करण्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षनेत्यांची काल बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शरद पवार यांनी महत्त्वाच्या सूचना देत हे सरकार सहा महिनेच टिकेल त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकांसाठी तयार राहा असे म्हणून त्यांनी आमदारांना सतर्क केले. पवारांच्या या वक्तव्यानंतर एकच गोंधळ उडाला असून माध्यमांवर याबाबत उलट – सूलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

या वक्तव्याचा समाचार घेत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर पोस्ट लिहून शरद पवारांवर टीका केली आहे. भातखळकर ट्वीटमध्ये लिहितात, “2019 लोकसभा निवडणुकाच्या वेळी देखील मोदी सरकार येणार नाही आणि आले तरी 12/ 13 दिवसांपेक्षा कोसळेल अशी बोगस भविष्यवाणी शरद पवार यांनी केली होती”, असे म्हणून पवार यांना भातखळकर यांनी पवारांना पुन्हा आठवण करून दिली.

अतुल भातखळकरांनी शरद पवारांच्या या बातमीचा फोटो पोस्ट करून त्यात शरद पवार यांना टॅग केले आहे. दरम्यान भातखळकरांच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांच्या अनेक गमतीशीर आणि मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्यामुळे राज्यात नवं युती सरकार पडणार की पाडणार अशा भविष्यवाण्यांना राज्यात ऊत दिसत आहे.

हे सुद्धा वाचा…

‘तुमची लायकी आता फक्त बटण दाबण्यापूर्ती’, निलेश राणे यांचा शिवसेनेवर घणाघात

बंडोबा – भाजप युती सरकार आज बाजी मारणार? विधानसभेत बहुमत चाचणीचे आव्हान

मनसेच्या संदीप देशपांडेंनी ठाकरे बाप-लेकाला डिवचले

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी