33 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमुंबईआजपासून 18 वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण होणार, महापालिकेची 5 लसीकरण केंद्रे सज्ज!

आजपासून 18 वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण होणार, महापालिकेची 5 लसीकरण केंद्रे सज्ज!

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. 1 मेपासून 18 वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार आहे. महापालिकेतर्फे 1 मे रोजी फक्त 18 वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण होणार आहे(Individuals over the age of 18 will be vaccinated). त्यासाठी महापालिकेच्या पाच लसीकरण केंद्रांवर तयारी ही करण्यात आली आहे.

18 ते 44 या वयोगटातील ज्या व्यक्तींनी कोविन ॲपवर नोंदणी केलेली आहे त्यांचे लसीकरण (Vaccination) होणार असून, लशींचा मोजकाच साठा उपलब्ध झाल्यामुळे पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.

सुप्रिया सुळेंच्या मदतीमुळे गरोदर कोरोनाग्रस्त महिलेला मिळाले उपचार

बीकेसी जम्बो कोविड सेंटर सुसज्ज नसल्याचा मनसेचा दावा

कोविड प्रतिबंधात्मक लशींच्या मोजक्याच मात्रा नुकत्याच प्राप्त

बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाला कोविड प्रतिबंधात्मक लशींच्या मोजक्याच मात्रा नुकत्याच प्राप्त झाल्या. या अनुषंगाने 1 मे 2021 रोजी महापालिकेच्या 5 लसीकरण केंद्रांवर केवळ 18 ते 44 या वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू करण्यात येत आहे (Vaccination is being introduced for individuals between the ages of 18 and 44). हे लसीकरण केवळ ‘कोविन ॲप’ मध्ये नोंदणी केलेल्या व्यक्तींसाठी असणार आहे. तसेच सध्यातरी लशीची केवळ पहिली मात्रा घेणाऱ्यांनाच या सुविधेचा लाभ दिला जाणार आहे.

Investigation: In Bihar, district hospitals have ventilators, but no staff to operate them

त्या त्या वेळी योग्य निर्णय घेतला जाईल

भविष्यात लशींच्या मात्रांचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप त्या त्या वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्वच पात्र नागरिकांचे लसीकरण (Vaccination) व्हावे, यासाठी महापालिका आवश्यक ते सर्व नियोजन करीत असून, नागरिकांनी लसीकरण करवून घेण्यासाठी गर्दी करू नये आणि कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे परिपूर्ण पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे या निमित्ताने पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महापालिकेच्या 5 रुग्णालयांमध्ये लसीकरण

  • बा. य. ल.‌ नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर).
  •  सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर).
  • डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर).
  •  सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर).
  • वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर.

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी