मुंबई

तुमच्या ‘अश्रूंशी’ मी गद्दारी करणार नाही

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिवसेना भवनातून पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जनसामान्यांचे आभार व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर जनतेमधून हळहळ व्यक्त करण्यात आली. याबाबतचे मत लोकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले. त्यामुळे माझ्यासाठी अश्रू ओघळणाऱ्यांशी मी गद्दारी करणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

‘या गेल्या आठ-दहा दिवसात मला जे काही मॅसेज आले, मला इतरही सोशल मीडियावरून जी माझ्या बद्दलची भावना कळली. मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा ऋणी आहे. असं क्वचित होत असेल की, एखादा माणूस अनपेक्षित आल्यानंतर तो आपले पद सोडताना रडतात. तर हि माझ्या आयुष्याची कमाई आहे. मी माझ्या परीने सांगेन की, जे अश्रू तुमच्या डोळ्यात आहेत त्या अश्रूंशी कधीही माझ्याकडून प्रतारणा, गद्दारी होणार नाही. तुमचे हे जे आज अश्रू आहेत, हे अश्रू आज माझी मोठी ताकद आहेत आणि या ताकदीसोबत मी कधीही हरामखोरपणा करणार नाही. सत्ता येते, सत्ता जाते पण तुमच्या सारखं प्रेम हे क्वचित कोणाला लाभत असेल ते मला लाभले’ असे मत यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी सत्तेत बसलेल्यांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी अमित शहा यांनी २०१९ च्या निवडणुकीत दिलेला शब्द न पाळल्याचे सांगितले. जर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अमित शहा यांनी त्यांना दिलेला शब्द पाळला असता तर, आज एक शानदार सरकार असते, असे देखील मत त्यांनी व्यक्त केले.

हे सुद्धा वाचा :

आता ‘आरे‘ला ‘कारे‘ होणारच

बंडखोरीचे राजकारण! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लावारीस गटाचे पालकत्व कोणाकडे?

विद्यमान मुख्यमंत्री ‘तथाकथित’ शिवसैनिक

पूनम खडताळे

Recent Posts

मोदी सरकारच्या काळात मुंबई पूर्णपणे दहशतवादमुक्त; परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने (Modi government) दहशवाद्यांविरोधात दिलेल्या कडव्या लढ्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पूर्णपणे…

12 mins ago

पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग, तो आम्ही मिळवणारच! अमित शाह

पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता, आहे, आणि यापुढेही राहील ही आमची भूमिका असून कोणतीही…

30 mins ago

विकासाच्या व्हीजनमुळे वाजेचा विजय निश्चित-शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागूल

राजभाऊ वाजे (Rajbhau Waze) हे सर्वसामान्यांचे कैवारी आहेत. त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन असून निवडून आल्यानंतर ते…

1 hour ago

व्यापार-उद्योग विकासाला प्राधान्य – उद्योगमंत्री उदय सामंत

देशाच्या आणि राज्याच्या अर्थ व्यवस्थेमधील महत्वाचे घटक म्हणून व्यापारी आणि उद्योजक (Trade and industry) यांची…

1 hour ago

डाॅ.तुषार शेवाळे यांचा भाजपात प्रवेश ; सहा वर्षांसाठी निलंबन

काॅग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व धुळे लोकसभेची उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेले डाॅ.तुषार शेवाळे (Dr Tushar Shewale)…

2 hours ago

शिंदेंची शेवटची फडफड, फडणवीस राजकारणातील कच्चे मडके : संजय राऊत

महाराष्ट्रात महाविकास आघाडी किमान 35 जागा जिंकेल. अजित दादांच्या उमेदवारांच्या निवडणुका संपल्याने ते आता मोकळे…

2 hours ago