27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमुंबईआता ‘आरे‘ला ‘कारे‘ होणारच

आता ‘आरे‘ला ‘कारे‘ होणारच

टीम लय भारी

मुंबई : नवीन सरकारला उध्दव ठाकरेंनी हात जोडून विनंती केली आहे की, तुम्ही पर्यावरणाशी खेळू नका. मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळू नका. आजही आरे काॅलनीच्या परिसरात बिबट्याचा वावर आहे. आरे काॅलनीच्या बाजूचे 500 एकर जंगल राखीव आहे. तरीही तिथे प्रकल्प करून झाडे तोडण्याचा प्रयत्न करू नका. जर शिंदे सरकारने उध्दव ठाकरेंचे ऐकले नाही, तर मात्र आरेला कारे म्हणजे मोठ्या प्रमाणात वाद होण्याची शक्यता आहे.

नव्या सरकारने शपथविधीच्या वेळेसच मेट्रो प्रकल्प पुन्हा गोरेगावमधील आरे काॅलनीमध्ये आणणार असल्याचे जाहिर केले. गेल्या तीन वर्षांपासून या प्रकल्पामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये घमासान सुरु आहे. मेट्रो कारशेड प्रकल्प आरेमध्ये होवू नये. यासाठी शिवसेना आणि पर्यावरण वादी संघटनांनी विरोध केला होता. आंदोलने करण्यात आली होती. तरी देखील फडणवीस मुख्यमंत्री असतांना आरे काॅलनीतील झाडांची कत्तल करून त्याच जागेवर मेट्रो कारशेडचा घाट घालण्यात आला होता. मात्र शिवसेनेचे सरकार आले त्यावेळी आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री होते. त्यांनी हा प्रकल्प कांजूरमार्ग येथे हलविण्यासाठी प्रयत्न केले.

हा प्रस्तावित प्रकल्प 100 टक्के कांजूरमार्गलाच होणार हे निश्चित झाले होते. मात्र आता या प्रकल्पावर कुरघोडी करण्यासाठी तो पुन्हा आरे मध्येच होणार असल्याचे एकनाथ सरकारने घोषित केले. त्यामुळे या जून्या वादाला नवीन धुमारे फुटणार आहेत, हे नक्कीच. आता आरेमध्ये कारशेड होण्यावरून नवीन वाद उफाळून येतील.

हे सुध्दा वाचा:

बंडखोरीचे राजकारण! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लावारीस गटाचे पालकत्व कोणाकडे?

रविवारी व सोमवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन

रोहित पवारांनी एकनाथ शिंदेंना सांगितली महत्वाची कामे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी