30 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeराजकीयविद्यमान मुख्यमंत्री 'तथाकथित' शिवसैनिक

विद्यमान मुख्यमंत्री ‘तथाकथित’ शिवसैनिक

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनातून पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह नवनिर्वाचित विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली. तर, मेट्रो कारशेडसाठी मंजूर केलेल्या कांजूर मार्ग येथील जागेबद्दल देखील त्यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले.

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री मानण्यास नकार दिला. याबाबतची भूमिका आज त्यांनी प्रसार माध्यमांसमोर घेतली. भाजपने तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदी बसवले आहे. त्यामुळे शिवसेनेला बाजूला करून मुख्यमंत्री पदी बसलेली व्यक्ती ही शिवसेनेची होऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.

अमित शहांनी शब्द पाळला असता तर,
२०१९ मध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद वाटून घेण्याबाबत अमित शहा आणि उद्धव ठकरे यांच्यामध्ये चर्चा देखील झाली होती. परंतु अमित शहा यांनी यासाठी नकार दिल्यानंतर शिवसेनेने आघाडी करून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत सरकार स्थापन केले. पण जर तेव्हाच अमित शहा यांनी युतीच्या सत्ता स्थापनेचा शब्द पाळला असता तर, आज भाजपचा व्यक्ती मुख्यमंत्री पदी असता. कदाचित ते शानदार सरकार असते. हेच जर आधी झालं असतं तर ते सन्मानाने झालं असत. हीच गोष्ट आता करायची होती, तर त्याला आधी नकार का दिला, असे प्रश्न यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून उपस्थित करण्यात आले.

हे सुद्धा वाचा :

जितेंद्र आव्हाडांनी घेतला मंत्रीपदाचा निरोप, कर्मचारी झाले भावूक

शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी गद्दारी केली, पण एका मंत्र्यांने पद गेल्यानंतरही उद्धव ठाकरेंप्रती कृतज्ञता व्यक्त केली

रोहित पवारांनी एकनाथ शिंदेंना सांगितली महत्वाची कामे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी