29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमुंबईतुमच्या 'अश्रूंशी' मी गद्दारी करणार नाही

तुमच्या ‘अश्रूंशी’ मी गद्दारी करणार नाही

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिवसेना भवनातून पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जनसामान्यांचे आभार व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर जनतेमधून हळहळ व्यक्त करण्यात आली. याबाबतचे मत लोकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले. त्यामुळे माझ्यासाठी अश्रू ओघळणाऱ्यांशी मी गद्दारी करणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

‘या गेल्या आठ-दहा दिवसात मला जे काही मॅसेज आले, मला इतरही सोशल मीडियावरून जी माझ्या बद्दलची भावना कळली. मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा ऋणी आहे. असं क्वचित होत असेल की, एखादा माणूस अनपेक्षित आल्यानंतर तो आपले पद सोडताना रडतात. तर हि माझ्या आयुष्याची कमाई आहे. मी माझ्या परीने सांगेन की, जे अश्रू तुमच्या डोळ्यात आहेत त्या अश्रूंशी कधीही माझ्याकडून प्रतारणा, गद्दारी होणार नाही. तुमचे हे जे आज अश्रू आहेत, हे अश्रू आज माझी मोठी ताकद आहेत आणि या ताकदीसोबत मी कधीही हरामखोरपणा करणार नाही. सत्ता येते, सत्ता जाते पण तुमच्या सारखं प्रेम हे क्वचित कोणाला लाभत असेल ते मला लाभले’ असे मत यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी सत्तेत बसलेल्यांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी अमित शहा यांनी २०१९ च्या निवडणुकीत दिलेला शब्द न पाळल्याचे सांगितले. जर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अमित शहा यांनी त्यांना दिलेला शब्द पाळला असता तर, आज एक शानदार सरकार असते, असे देखील मत त्यांनी व्यक्त केले.

हे सुद्धा वाचा :

आता ‘आरे‘ला ‘कारे‘ होणारच

बंडखोरीचे राजकारण! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लावारीस गटाचे पालकत्व कोणाकडे?

विद्यमान मुख्यमंत्री ‘तथाकथित’ शिवसैनिक

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी