30 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीयबंडखोरीचे राजकारण! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लावारीस गटाचे पालकत्व कोणाकडे?

बंडखोरीचे राजकारण! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लावारीस गटाचे पालकत्व कोणाकडे?

टीम लय भारी

मुंबई : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथून (दि.१ जुलै) समाजमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. “नवीन मुख्यमंत्री हा शिवसेनेचा नाही, शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊच शकत नाही”, असे म्हणून त्यांनी पक्षाची भूमिका यावेळी स्पष्ट केली, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लावारीस गटाचे पालकत्व नेमकं कोणाकडे असा प्रश्न यानिमित्ताने सर्वसामान्यांमधून पुढे येत आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाची शपथविधी झाल्यानंतर जे पोस्टर झळकले, ते वेगळंच चित्र सांगणारे होते. बऱ्याचशा पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो होते मात्र त्यावर उद्धव ठाकरे कुठेच नव्हते, त्यामुळे सध्या ‘शिवसेना खुर्द’ आणि ‘शिवसेना बुद्रुक’ असे विभाजन झालेली शिवसेना दिसू लागली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे विराजमान असले तरीही बंडखोर शिवसेना आमदारांकडून वेगळ्याच शिवसेनेचे चित्र रेखाटले जात आहे, त्यामुळे शिवसेनेचे पालक कोण यावर सर्वचजण बुचकळ्यात पडल्याची स्थिती सध्या दिसत आहे.

त्यावर मौन सोडत उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आणि फुटलेले आमदार शिवसैनिक नाहीत असे स्पष्ट केले. तरीही शिंदे गटाची भूमिका कायम असून “आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक” असल्याचा उल्लेख वारंवार होत असल्याचे दिसून येत आहे.

शिवसेना नेमकी कोणाची?

नियमाप्रमाणे शिवसेनेची सुद्धा स्वतःची एक घटना आहे, ज्याची नोंद रीतसर राज्य निवडणूक आयोगाकडे नमूद आहे. शिवसेना कार्यकारणीने ठरवल्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदी नोंद करण्यात आलेली आहे. वारसा हक्क आणि कार्यकारणीचे समर्थन यामुळे पक्षाचे संपूर्ण अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवलेले आहेत. परंतु विधानसभेत शिंदे गटाचे संख्याबळ जास्त असल्याने शिवसेना पक्ष म्हणून ते पुढे कारभार करू शकतात का? हा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे. तसेच तज्ज्ञांकडून सुद्धा चर्चिला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्रीपदी बसलेले नवनियुक्त एकनाथ शिंदे तथाकथीत मुख्यमंत्री असून ते शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्याने हा वाद आणखी चिघळणार असून शिवसेनेचा हा वाद आणखी वाढणार की लवकरच मिटणार हे पाहणे या निमित्ताने महत्त्वाचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा:

विद्यमान मुख्यमंत्री ‘तथाकथित’ शिवसैनिक

पहिल्याच दिवशी शेतकरी ‘आत्महत्या’ थांबवण्याचा शिंदे सरकारचा संकल्प

जितेंद्र आव्हाडांनी घेतला मंत्रीपदाचा निरोप, कर्मचारी झाले भावूक

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी