33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमुंबईपुन्हा गणेशनगरी दुमदुमणार, लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मोठा निर्णय

पुन्हा गणेशनगरी दुमदुमणार, लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मोठा निर्णय

टीम लय भारी
मुंबई- मुंबईचा गणेशोत्सव सर्वत्र प्रसिद्ध आहे. गेल्यावर्षी कोरोनाच्या भीषण महामारीमुळे अनेक मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी साध्या पद्धतीने हा सण साजरा केला होता. मुंबईची शान असणाऱ्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मूर्तीची प्रतिष्ठापना केली नव्हती, परंतू या वर्षी या मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या वर्षी ‘ लालबागचा राजा ‘ गणेशोत्सव साजरा होणार आहे. (Lalbaug ganeshotsav mandal is planning to have big fat celebration on occasion of ganeshotsav)

लालबागच्या राजाच्या देशभरतील लाखो भक्तांसाठी ही गोष्ट मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे. सर्व कोरोणाचे नियम पाळून हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. एक वर्षाचा खंड पडून पुनः एकदा लालबागच्या राजाचे थाटामाटात आगमन होणार आहे.

मुख्यमंत्र्यांना फडणविसांचे पत्र, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केल्या 26 तातडीच्या आणि दीर्घकालीन मागण्या

Lalbaug
पुन्हा गणेशनगरी दुमदुमणार

सिंधूने भारताला मिळवून दिले कांस्यपदक

गणेश भक्तांच्या विनंतीवरून यावर्षी, राज्य सरकारच्या सर्व मार्गदर्शक सूचना पाळून गणेशोस्तव साजरा करण्याचे लालबागचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जाहीर केले आहे. गणेशमूर्तीच्या उंचीवर सरकारने काही निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध लक्षात ठेऊन यंदाच्या वर्षीची गणेशमूर्ती ही 4 फुटांचीच असणार आहे. त्याचबरोबर यंदाच्या वर्षी अपल्या लाडक्या राजाचे दर्शन घडणार आहे. दर्शन घेण्यासाठी दरवर्षी प्रचंड गर्दी उसळते, परंतू यंदा कोविड मुळे गर्दी टाळणे हे आवश्यक आहे. हे टाळण्यासाठी मंडळाकडून नियमांची आखणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन दर्शन देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

अवैध दगड खाणीवर छापा, दोन मशीन जप्त

Maharashtra’s First Ever Zika Virus Case Reported In Pune District

गेल्या वर्षी, कोरोना महामारीमुळे, उंचा मूर्ती बसवून, भव्य अरस करून गणेशोत्सव साजरा न करता, लालबागचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘ आरोग्य उत्सव ‘ साजरा केला होता. या त्यांच्या उपक्रमाची दखल स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील घेतली होती, आणि या उपक्रमाची स्तुती देखील केली होती. यंदाच्या वर्षी गणपती बाप्पा मोरया, लालबागच्या राजाच्या विजय असो अश्या जयजयकाराने लालबाग नागरी पुन्हा दुमदुमणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी