33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूजसिंधूने भारताला मिळवून दिले कांस्यपदक

सिंधूने भारताला मिळवून दिले कांस्यपदक

टीम लय भारी

टोकियो :- भारताची बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधू हिने टोकीयो ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले. अशा प्रकारे ती ऑलिम्पिकमध्ये दोन पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला बनली आहे. सिंधूने चीनच्या ही बिंग जीआओचा पराभव करत भारताला कांस्यपदक मिळवून दिले. (Sindhu won bronze medal in Tokyo Olympics 2020)

या पूर्वी मीराबाई चानूने वेटलिफ्टींगमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती. तर आता सिंधूने भारताला कांस्यपदक मिळवून दिले आहे. रविवारी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंग जीआओचा २१-१३ , २१-१५ असा पराभव केला.

मुख्यमंत्र्यांना फडणविसांचे पत्र, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केल्या 26 तातडीच्या आणि दीर्घकालीन मागण्या

Sindhu
पी. व्ही. सिंधू

अवैध दगड खाणीवर छापा, दोन मशीन जप्त

पहिल्या सामन्यात सिंधूने ४-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर बिंगने सिंधूला प्रत्युत्तर देत ५-५ अशी बरोबरी केली. चांगला खेळ करत सिंधूने १५-९ अशी आघाडी घेतली. अखेर २१-१३ असा स्कोअर करत सिंधूने पहिला सेट जिंकला.

या नंतरच्या दुसऱ्या सेटमध्ये सिंधूने ४-१ अशी आघाडी घेतली. नंतर सिंधूने आघाडी वाढवत ११-८ असा स्कोअर केला. शेवटी सिंधूने २१-१५ असा स्कोअर करत दुसरा सेटदेखील जिंकला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे शुभारंभ

Maharashtra’s First Ever Zika Virus Case Reported In Pune District

सिंधूचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले :-
सिंधूला शनिवारी झालेल्या सेमी फायनलमध्ये निराशा मिळाली होती. तिचा चीनच्या ताइ जू यिंग हिने २१-१८ , २१-१२ असा पराभव केला होता. त्यामुळे भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याची तिची इच्छा अपूर्ण राहिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी