35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
HomeमुंबईLocal for all : लोकल सर्वांसाठी सुरु करण्यासाठी राज्य सरकारचे रेल्वे बोर्डाला...

Local for all : लोकल सर्वांसाठी सुरु करण्यासाठी राज्य सरकारचे रेल्वे बोर्डाला पत्र

टीम लय भारी

मुंबई : सर्वसामान्यांसाठीही मुंबई लोकल सुरु करा, (start local for all) अशी मागणी करणारे पत्र राज्य सरकारने रेल्वेला लिहिले आहे. (The state government has written a letter to the railways demanding to start Mumbai local for all common man as well.) दिवसभरात तीन टप्प्यांत प्रवासाची मुभा देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून या पत्रावरील उत्तराची प्रतीक्षा आहे.

सकाळी ७.३० वाजल्यापासून सर्वसामान्यांना प्रवासाची मुभा द्या, सकाळी आठ ते साडेदहा वाजल्याच्या दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांसाठी लोकल सुरु ठेवा. तर सकाळी ११ ते दुपारी ४.३० या वेळेत सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा द्या, अशी मागणी करण्यात आली आहे. सामान्यांसाठी लोकल कधी सुरु होणार हे अद्याप अस्पष्टच आहे. सरकारने सध्या फक्त शक्यतांवर प्रतिसाद मागितला आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर लोकल गाड्या बंद करण्यात आल्या. ७ महिन्यानंतर अखेर आता लोकल महिला, वकील आणि सुरक्षा रक्षक तसेच कामगारांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. अशातच आता लवकरच सर्व प्रवाशांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत ठाकरे सरकारने दिले आहेत.

राज्य सरकार आणि रेल्वे अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत खासगी क्षेत्रात काम करणारे नोकरदार आणि सर्वच प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याबाबत चर्चा झाली होती. महिलांना ज्याप्रकारे लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली त्याच धर्तीवर अन्य प्रवाशांना परवानगी देता येईल का?, त्यात वेळेचे बंधन घालावे का? याविषयी बैठकीत चर्चा झाली. खासगी क्षेत्रात काम करणा-या नोकरदारांची संख्या मोठी आहे. त्याअनुषंगाने लोकल सेवेवर किती ताण येऊ शकतो, याचाही विचार केला गेला. त्यामुळे लवकरच सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यात येऊ शकते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी