31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रराज ठाकरे म्हणाले, ठाकरे सरकारसोबत राज्यपालांचे सख्य

राज ठाकरे म्हणाले, ठाकरे सरकारसोबत राज्यपालांचे सख्य

टीम लय भारी

मुंबई : ठाकरे सरकार व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील ‘साप मुंगुसा’चे नाते महाराष्ट्रातील जनता अनुभवत आहे. पण या नातेसंबंधावर आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मिश्कील भाष्य केले ( Raj Thackeray comments on Governor – Thackeray government relation ).

सामान्य लोकांना येत असलेली भरमसाठ विजबिले आणि शेतकऱ्यांच्या दुधाला दरवाढ देण्याबाबत राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली ( Raj Thackeray meets Governor Bhagat singh Koshyari on excessive light bills ).

याबाबत आपण शरद पवार यांच्याशीही दूरध्वनीवरून बोलणार आहोत. वेळ पडली तर त्यांची भेट घेऊ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेऊ असे राज ठाकरे म्हणाले ( Raj Thackeray will meet to Sharad Pawar and Uddhav Thackeray ).

राज्यपालसुद्धा सरकारशी बोलतील. परंतु राज्यपाल आणि सरकार यांच्यात फारच सख्य आहे. त्यामुळे हा विषय किती पुढे जाईल माहित नाही. पण राज्याचे प्रमुख या नात्याने मी राज्यपालांची भेट घेतल्याचे ठाकरे म्हणाले.

भगतसिंग कोश्यारी यांना राज ठाकरे पहिल्यांदाच भेटले ( Raj Thackeray first time meets Governor along with Amit Thackeray, Bala Nandgaonkar, Shalini Thackeray ). यावेळी त्यांच्यासोबत अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, शालिनी ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Raj Thackeray comments on Governor – Thackeray government relation
राज ठाकरे यांनी राज्यपालांना निवेदन दिले

राज्य सरकारचा कारभार कुंथत कुंथत

विजबिल व दुध दरवाढीचे विषय राज्य सरकारला माहित आहेत. तरीही त्यावर निर्णय का होत नाही. लवकरात लवकर यावर निर्णय व्हावा.

गेल्या सात – आठ महिन्यांपासून ‘कोरोना’मुळे लोकांचे रोजगार गेले आहेत. अनेकांना कामे नाहीत. घरी पैसे येत नाहीत. अशा सगळ्या समस्या असताना वीजबिले पाच पट, सहा पट, आठ पट येताहेत. कुठून लोकं पैसे भरणार आहेत. असा सवाल राज ठाकरे यांनी केला ( Raj Thackeray scathing to Thackeray government ).

बिले भरली नाहीत तर, त्यांचा विजपुरवठा खंडीत केला जाईल. एका छोट्या निर्णयासाठी इतका वेळ लागत असेल तर त्याला काही अर्थ नाही. लोकांची भावना लक्षात घेता सरकारने येत्या एक – दोन दिवसांत निर्णय घ्यावा.

मी राज्यपालांना हा विषय सांगितला आहे. ते सरकारशी बोलतीलच. पण सध्या राज्यपाल आणि सरकार यांचे फारच सख्य असल्यामुळे हा विषय किती पुढे जाईल माहीत नाही. पण राज्याचे प्रमुख म्हणून मी त्यांची भेट घेतली.

Raj Thackeray comments on Governor – Thackeray government relation
राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे प्रमुख नेते उपस्थित होते

अकरावीचे प्रवेश अडले आहेत. रेल्वे सुरू होत नाहीत. रेस्टॉरन्ट चालू झाली आहेत, पण मंदीरे नाहीत. रस्त्यावर ट्रॅफिक नाही, पण रेल्वे चालू नाही. हा धरसोडपणा चालू आहे. कुंथत कुंथत सरकार चालत नाही. या बाबतीत सरकारने सगळ्या गोष्टींचा नीट विचार करून लोकांना दिलासा द्यावा, असेही ठाकरे म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी