35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमुंबईमुंबई महानगरपालिकेचा 2022-23 वर्षाचा अर्थसंकल्प सादर

मुंबई महानगरपालिकेचा 2022-23 वर्षाचा अर्थसंकल्प सादर

टीम लय भारी

मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बीएमसी आयुक्त आयएस चहल गुरुवारी 2022-23 वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. आयुक्त चहल सकाळी 11 वाजता स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे ऑनलाइन अंदाजपत्रक सादर केला. अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे दहा वाजता शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांच्याकडे शैक्षणिक अंदाजपत्रक सुपूर्द केला. बीएमसीचे 2021-22 या वर्षाचे बजेट 39038.83 कोटी रुपये होते. यावेळी 45 हजार 949.21 कोटींचा आणि 8.43 कोटी शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला(Mumbai Municipal Corporation budget for the year 2022-23 presented).

कोरोनाचा सामना करण्यासाठी बीएमसीने राखीव निधीतून ५००० कोटी रुपये खर्च केलेतसेच जीएसटीच्या माध्यमातून राज्य सरकारला मार्चपर्यंतच आर्थिक मदत मिळणार आहे. त्यानंतर या मदतीबाबत केंद्राने कोणताही निर्णय घेतलेला नाही. मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांसाठी मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे, ज्यामुळे बीएमसीच्या महसुलात दरवर्षी 4,500 कोटी रुपयांची घट होणार आहे. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात शिक्षण विभाग, आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद महापालिकेने केली आहे. सन 2022-2023 चा 45 हजार 949.21 कोटींचा आणि 8.43 कोटी शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला(BMC revenue is expected to decline by Rs 4,500 crore annually).

मुंबई महापालिका अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा :

1) आगामी मुंबई महापालिका निवडणुकींच्या तोंडावर महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर, यंदाचा अर्थसंकल्प आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्पात 17.70% ची वाढ, यंदा 45949 कोटींचा अर्थसंकल्प सादर

2) विकास नियोजन खात्याकडून मिळणारे उत्पन्न 2 हजार कोटी रुपये, असा अंदाजित केला होता. ते 14750 कोटी रुपये इतके सुधारित करण्यात आले आहे. त्यामुळे त्यात 12750 कोटी रुपये इतकी तरतूद
500 चौ. फुट किंवा त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असलेल्या निवासी मालमत्तांना सवलत जवळपास 16,14,000 नागरीकांना मालमत्ता करामधून 100% सवलत. प्रतिवर्षी नागरीकांना देण्यात येणाऱ्या सवलतीची रक्कम ₹462 कोटी इतकी असेल.

3) सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता करापोटी मिळणारे अंदाजित. उत्पन्न हे 7000 कोटींवरुन 4800 कोटी रुपयांची सुधारीत तरतूद

4) मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात वाढ, तरी तिजोरीला मात्र गळती, महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट, मालमत्ता करातून मिळणारं उत्पन्न 7000 कोटींवरुन 4800 कोटी इतकं सुधारित करण्यात आलंय

5) निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांसाठी नव्या ‘वापरकर्ता शुल्का’ची घोषणा, कचरा निर्मीती करणाऱ्यांना भरावं लागणार शुल्क, वर्षाकाठी वापरकर्ता शुल्कातून 174 कोटींच्या उत्पन्नाचे लक्ष्य

6) मुंबईतील महत्वाचे मोठे प्रकल्प कोस्टल रोड, जीएमएलआर, एसटीपी अशा प्रकल्पांच्या भांडवली खर्चात मोठी वाढ, मागील वर्षाच्या तुलनेत भांडवली खर्चात 56% वाढ, 22646.73 कोटींचा भांडवली खर्च

7) मुंबई अर्थसंकल्पात कलाकारांसाठी दोन नव्या योजना, तरुण चित्रपट निर्मात्यांना चालना देण्यासाठी ‘युनेस्को क्रिएटीव्ह सिटी ऑफ फिल्म’, चित्रकलाकारांसाठी बस शेल्टर मोहीम

8) मुंबईकरांना खाऱ्या पाण्यातून गोडे पाणी मिळणार, मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी पाणीपुरवठा व्यवस्थेवर भरीव तरतूद, खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याच्या नि:क्षारीकरणासाठी 200 कोटींची तरतूद

9) मुंबई महापालिकेच्या बजेटवर आदित्य ठाकरेंच्या संकल्पनांचा ठसा, मुंबईतील वाढत्या हवामान बदलांसाठीच्या कृती आरखड्यासाठी 1 कोटींची तरतूद, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची ही संकल्पना

10) मुंबई पुरमुक्त आणि पर्जन्य जल उदंचन 526 कोटींची तरतूद, मुंबईत पुलांची दुरूस्ती आणि निर्मितीसाठी भरीव तरतूद 1576 कोटींची, नद्यांच्या पुनरूज्जीवनासाठी 200 कोटी, दहिसर पोईसर ओशिवरा आणि वालभट्ट नद्यांचे पुनरूज्जीवन

11) मुंबईतील नवे रस्ते तसेच, रस्ते सुधारणांकरता 2200 कोटींची तरतूद, मुंबईतील 47 पुलांच्या मोठ्या दुरुस्त्या, 144 पुलांच्या किरकोळ दुरुस्त्यांच्या कामासाठी 1576.66 कोटींची तरतूद

12) मुंबईतील मलनि:सारण प्रकल्पांसाठी (एसटीपी) 2072 कोटींची तरतूद, यापैकी 7 एसटीपी प्रकल्पांसाठी 1340 कोटींची तरतूद

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगद्याचे नागरी काम पूर्णत्वास

बीएमसीने गेल्या पाच वर्षांत भटक्या कुत्र्यांची नसबंदीसाठी नऊ कोटी रुपये खर्च केले

आदित्य ठाकरेंचा पुढाकार, मुंबईतील सहा किल्ल्यांचे भाग्य उजळणार

BMC’s budget stresses on ease of living this year

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी