32 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeमुंबईआदित्य ठाकरेंचा पुढाकार, मुंबईतील सहा किल्ल्यांचे भाग्य उजळणार

आदित्य ठाकरेंचा पुढाकार, मुंबईतील सहा किल्ल्यांचे भाग्य उजळणार

टीम लय भारी

मुंबई : मुंबईतील सहा मध्ययुगीन आणि ब्रिटीशकालीन किल्ले लवकरच पर्यटन स्थळे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी राज्य शासनातर्फे विकसित केले जाणार आहेत. या प्रकल्पांतर्गत वांद्रे, वरळी, शिवडी, माहीम, धारावी आणि सेंट जॉर्ज हे किल्ले समाविष्ट आहेत. याबाबतचा अंतिम प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे(Aditya Thackeray’s initiative will brighten the fortunes of six forts in Mumbai).

“सांस्कृतिक आणि इतर कार्यक्रम आयोजित करता येतील अशी ठिकाणे म्हणून किल्ले विकसित केले जातील. यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी संसाधने निर्माण होतील, प्रकल्प आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होईल आणि ही स्थळे सांस्कृतिक ठिकाणे म्हणून विकसित होतील,” असे संग्रहालय आणि पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांना सांगितले. गर्गे पुढे म्हणाले की, या प्रकल्पासाठी माहीम किल्ल्यातील झोपड्यांच्या पुनर्वसनासह सुमारे ₹50 कोटी खर्च येईल.

हे सुद्धा वाचा

मुंबई उपनगर जिल्ह्यात विकासाची कामे सुरु : आदित्य ठाकरे

दादर स्थानकाचे छत 600 झाडांसारखे असणार!

मलबार हिल ट्रीटॉप वॉकवेच्या बांधकामासाठी BMC देणार 22 कोटींचे कंत्राट

Aditya Thackeray launches 2 Oxygen cylinder recharge points

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा प्रकल्प पर्यटन आणि संस्कृती खात्यांद्वारे चालविला जात आहे, असेही ते म्हणाले. या प्रकल्पासाठी वास्तुविशारदाची नियुक्ती करण्यात आली आहे, जो या किल्ल्यांचे संवर्धन आणि संरक्षण आणि किल्ले सर्किट विकसित करण्यासाठी आराखडा तयार करेल).

किल्ल्यांवर मुंबईच्या इतिहासाची माहिती देणारा ध्वनी आणि प्रकाश शो देखील पाहायला मिळणार आहे, जो परिसरातील कोणतेही ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी मोबाईल अॅप वापरून प्रवेश करता येईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी